पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1576

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

frequentative verb पौनःपुन्यवाचक क्रियापद n. Frequent'er n. खेपा घालणारा, नेहमींचा येणारा. Fre'quently adv. वारंवार, वरचेवर, पुनःपुनः, घडीघडी, अनेकवार, फारदां, नेहमी (loosely). Fre'quentness n. पौनःपुन्य n. Fresco ( fres'ko ) [ It. fresco, cool, fresh. ] n. a painting on fresh plaster ताज्या -ओल्वा गिलाव्यावर काढलेले चित्र n. २ the art of painting on freshly spread plaster, before it dries ताज्या पसरलेल्या -ओल्या गिलाव्यावर चित्रे काढण्याची कला f. ३ (in modern parlance, incorrectly applied to) painting on plaster in any manner कोणतेही ओल्या गिलाव्यावरचे चित्र n. F. v.t. to paint in fresco, as walls भिंतीच्या गिलाव्यावर चित्रे काढणे. Fresco'ing pr. p. & v. n. Fresco'ed pa. t. and pa. p. Fresco'er n. Fresco'ist n. भिंतीच्या गिलाव्यावर चित्रे काढणारा. Fresh (fresh) [A. S. fersc, fresh.] a. new and strong, unimpaired, sound रसभरित, टवटवीत, ताजा, नूतन, नवीन, ताजातवाना, ताज्या दमाचा. २ new नूतन, नवीन, नवा, ताजा, दुसरा, कोरा. ३ not stale गोड, ताजा, साजूक, लोणकडे (तूप n.), अनसूट. ४. youthful तारुण्याचा, भरज्वानीचा, लालीचा. ५ unpractised नवा, नवखा, नवशिखा, बिनवहिवाटीचा, राबलेला नाही असा, घसवटलेला नाही असा, शिकाऊ, अननुभवी, अनभ्यस्त. ६ (a) renewed in vigour, alacrity, or readiness for action ताज्या नव्या दमाचा, पुनर्नवीन. [To LOOK F. टवटवणे, टवटवीत. सतेज-तेजस्वी दिसणे.] (b) (hence) tending to renew in vigour नवीन दम किंवा जोर दाखविणारा. ७ not salt खारट-तुरट नव्हे असा, गोड, गोडा, गुळचट; as, " F. water" =गोडे पाणी n. F. n. a spring of fresh water गोड्या पाण्याचा झरा m. २ the mingling of fresh water with salt in rivers or bays, as by means of a food of fresh water flowing toward or into the sea (गोड्या पाण्याचा ओघ समुद्रात जाऊन) गोडे व खारें पाणी एक होणे n. Fresh'en v.t. to separate, as water, from saline ingredients (समुद्राच्या किंवा खाऱ्या पाण्यांतील) क्षार काढून टाकणे, खाऱ्या पाण्याचे गोडे पाणी करणे, गोडावणे, गोडा-गोडे करणे. F. v. i. to grow fresh ताजातवाना होणे. २ to grow brisk or strong मजबुती f-तकवा m येणे, ताजा-हुशार होणे. Fresh'et n. (obs.) a stream of fresh water (गोड्या) पाण्याचा झरा m. २ a sudden inundation पूर m, अकस्मात आलेला पाण्याचा लोंढा m. Fresh'ly adv. Fresh'man n. a novice नवा अनभ्यस्त -नवशिका -अपरिचित, अननुभवी मनुष्य. २ a student during his first year in a college or university कॉलेजांतील किंवा युनिव्हर्सिटीतील पहिल्या वर्षाचा विद्यार्थी m. Fresh'manship n. Fresh-new a. ( obs. ) (Shakes. ) unpractised. नवशिका. Fresh'ness ताजेपणा m, नूतनता f, नवीनपणा m. २ नवेपणा m, नवखेपणा m, नवशिखेपणा m,