पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1572

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नव्हे असा. २ a member of a borough, town, or a state, who has the right to vote at elections कसबा, नगर किंवा संस्थान ह्यांतर्फे निवडणुकीत मत देण्याला अधिकारी मनुष्य m. Free'dom n. liberty, independence स्वातंत्र्य n, स्वतंत्रता f, मोकळेपणा m, स्वाधीमता f, स्वेच्छाचारिता f. २ ( shakes.) franchises स्वतंत्रमताधिकार m, विशेष अधिकार m. pl., विशेष सवलती f. pl. ३ exemption from necessity, in choice and action इच्छास्वातंत्र्य n, वर्तनस्वातंत्र्य n. ४ ease, facility साहजिकता f, सहजपणा m, अनायास m. ५ frankness मोकळेपणा m, निष्कपटपणा m, उघडपणा m. ६ improper familiarity (अयोग्य) लगट f, (शिष्टाचार गुंडाळून ठेऊन-शिष्टाचारास सोडून) फाजील लगट f. Freed'-man n. a man who has been a slave, and has been set free गुलामगिरीतून -दास्यस्वांतून मुक्त केलेला मनुष्य m. Free'hand a. done by the hand without support or the guidance of instruments (हत्यारांच्या साहाय्यावांचून) केवळ हाताने केलेले काढलेलें; as, " F. drawing." Free'-handed a. liberal सढळ, उदार. Free-hearted a. (a) frank मोकळा, निष्कपटी, दिलदार. (b) generous उदार (दाता). Free'heartedly adv. Free'heartedness n. Free-hold n. law. an estate in real property, of inheritance (in fee simple or fee tail ) or for life पूर्ण मालकीची -पूर्ण स्वामित्वाची जमीन f. अशा जमिनीवर राजास करभार देण्याखेरीज दुसरा नोकरीचा वगैरे कोणत्याही प्रकारचा बोजा नसतो. मराठीतील 'वतन' शब्दांत व इंग्रजी 'फ्रीहोल्ड' शब्दांत कायद्याचे हष्टीने बरेच अंतर आहे. 'Freehold' शब्दाचे भाषांतर कायद्याच्या परिभाषेत 'वतन' शब्दाने बरोबर होत नाहीं. [ Freehold is opposed to Leasehold and Copyhold. ] (b ) the tenure by which such estate is held इंग्लंडांतील पूर्ण स्वामित्वाच्या जमीनधाऱ्याची पद्धत f. Free'-holder n. the possessor of a freehold पूर्ण मालकी असलेला जमीनदार. Free-labour n. the labour of freemen, as distinguished from that of slaves स्वतंत्र माणसाचे श्रम m. pl. Free'liver n. one given to indulgence in eating and drinking खानपानांत मनसोक्त वागणारा. Free'-love n. the doctrine or practice of consorting with the opposite sex, at pleasure, without marriage लग्नावांचून स्त्रीपुरुषांनी एकमेकांशी यथेच्छ व्यवहार करणे n. Free'ly adv. मोकळेपणाने, &o. Free'mason n. one of an ancient and secret association or fraternity, said to have been at first composed of masons or builders in stone, but now consisting of persons who are united for social enjoyment and mutual assistance फ्रीमेसन, (फ्रीमेसननामक) विशेष प्रकारच्या गूढ सांप्रदायाचे लोक m.pl.; इहसुखेच्छा आणि त्यांत परस्परसाहाय्य हे यांचे मुख्य हेतु होत. Free'-masonic a. Free-masonry n. (फ्रीमेसन-