पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1571

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाप्या, ( ज्याचा तो ) मुखत्यार, ज्याला कोणी दाबता नाही असा, स्वाधीनचा. ४ released from arrest बंधमुक्त, अटकेंतून मोकळा सुटलेला, सोडून दिलेला. [ To SET F. मोकळा बंदखलास करणे, मुक्त-बंधमुक्त करणे, सोडून देणे, बंध सोडणे -सोडविणे.] ५ endowed with moral liberty ( said of will ) स्वतंत्र, स्वतंत्र कार्यक्षमता असणारी (व्यक्तीची इच्छा). ६ guiltless, innocent निरपराधी, अनपराधी, निष्कलंक, अकल्मष, पापरहित, दोषरहित. ७ frank, unreserved उघडा, मोकळ्या मनाचा, खुल्या मनाचा, खुल्या दिलाचा, सरल, निष्कपटी. ८ licentious (used in a bad sense .) स्वैर, स्वैरवृत्ति, अनर्गल, निरर्गल, अमर्याद वागणारा, बेसुमार, बेलगाम, बेफाम, कामचार (S). ९ lavish, open-handed, liberal उदार, सढळ हाताचा, दानशूर; as, " F. with his money." १० exempt, clear (followed by from) मोकळा, मुक्त, सुटा, वेगळा, निराळा, अलग, रहित ( in com.; as, दोषरहित). ११ charming (Said of style) अकुंठित, मोकळी, प्रशस्त, सरळ, मनोवेधक. (b) सहज, साहजिक, लीलेने केलेला. १२ ready, spirited. (एका पायावर) तयार, उत्सुक, उल्हासी, उत्साही, उत्साहपुर्ण. पाणीदार. बाणेदार; as " A. F. horse." १३ admitted. to special rights ( followed by of) विशेष हक्क m -सवलत अधिकार m असलेला दिलेला -भोगणारा. १४ open, unrestricted, thrown open or made accessible to all ( said of & thing to be possessed or enjoyed ) फुकटचा, मुक्त हार, सर्वीस सारखा खुला -मोकळा असणारा, मोफत -बिनखर्चाने -फुकट मिळणारा, बिनखर्चाचा.; as, " A. F. school". १५ gratuitous, not granted by importunity or purchase फुकट मिळणारा; as, "F. admission." & not arbitrary or despotic ( said of a government or institution &c.) स्वतंत्र, व्यक्तिस्वातंत्र्याच्या आंड न येणारा, एक व्यक्ति किंवा एक वर्ग याचाच अधिकार चालू न देणारा, सर्वसत्ताक, लोकसत्ताक. १७ separated, unattached निराळा, विभक्त, माेकळा, स्वतंत्र, असंसक्त, न कोडलेला. F.V. t. (a) to set at liberty ( followed by from ) सोडणे, मोकळा-मुक्त -बंधमुक्त -बंदखलास करणे, (-ची) मोकळीक f- सुटका f. करणे. ( b) to disentangle, to clear ( followed by form) गुंतागुंतीतून निराळा काढणे, वेगळा -सुटा करणे, सोडवणूक करणे g. of o., बंधन n- तोडणे, मोचन n. करणे. २ to relieve from the constrains of (च्या) दाबांतून मोकळा करणे. Free'ing pr. p. Freed pa. t. & -pa. a. Free agency the capacity or power of choosing or acting freely स्वतंत्रता f, स्वातंत्र्य n, कर्मस्वातंत्र्य n, इच्छास्वातंत्र्य n, वर्तनस्वातंत्र्य n. Fres'booter n. a pillager लुटारू, लुटारी, पेंढारी, पुंड, पुंडपाड. Free' booting a. & n. Free'-booty n. लूट f. Free-born a. born free आजन्म स्वतंत्र. जन्मतः स्वतंत्र, स्वतंत्रतेत जन्मलेला. Free'-man n. one not a slave or vassal स्वतंत्र मनुष्य m, दास किंवा गुलाम