पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1560

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

to bring up, to nourish (दुधाने -अन्नाने) पालन करणे, पोषण करणे, जोपासना करणे, वाढवणे, लहानाचा मोठा करणे. २ to cherish वाहणे, वागवणे, बाळगणे, राखणे. ३ to promote the growth of, to sustain and promote वाढीस लावणे, वृद्धिंगत करणे, वाढवणे, जोपासना करणे. Foster-brother n. दूधंभाऊ m, दाईभाऊ m,(b) pl.एकाच आईबापाची नव्हत परंतु एकाच दाईच्या दुधावर वाढलेली मनुष्ये n. pl. Foster-child n. पाळीव-पोसका -पोसगा -पोसणा or पोष्णा मुलगा m -मुलगी f, (आईच्या आंगावरचे दूध न मिळतां) दाईच्या दुधावर वाढलेलें मूल n. Fos'terdam n. a nurse दाई f. Foster-daughter n. पोष्णी -पाळीव लेंक f, पोष्णीपाळीव बेटी f. Foster-father n. पाळकबाप m. Fos'terling n. Same as Foster-child. Foster-mother n. दाई.f, पालक माता f, धात्री f, मातृका f, उपमाता f. Foster-nurse n. दाई f. Foster-sister n. दूधबहीण f, दाईबहीण f. Foster-son n. पाळीव लेक m, पाळीव बेटा, पाळीव पुत्र m. Fos'terage n. the charge of nursing दाईचे वेतन n, -पगार m. Fos'tered a. पोसलेला, परिपालित. Fos'terer n. पोसणारा, पोशिंदा. Fought pa. t. & pa. p. of Fight. Foul (fowl) [ M. E. foul ; A. S. ful.] a. filthy, dirty, defiled मळका, मळकट, मलिन pop. मळीण, मळसर, मलदूषित, कलुष, दूषित, घाणेरडा, अस्वच्छ. २ abusive निंदाव्यंजक, बीभत्स, कुत्सित, अप and कु ( in comp.; as, अपकृत्य, अपशब्द, कुशब्द, &c.). ३ detestable निंद्य, गद्य, त्याज्य, धिक्कारणीय, तुच्छ. ४ loathsome घाणेरा, घाणेरडा, ओंगळ, ओखटा, मुरदाड or मुडदार, अमंगल. ५ unfavourable (of wind) उलटा, तोंडचा, पुढचा, समोरचा, प्रतिकूल; (-of weather ) जौळी, वादळी. ६ unfair, dishonest खोटा (खेळ इ०), अप्रामाणिक, असरल, अनृजु, कुटिल, आडमार्गाचा, गैरवाजवी, अन्यायाचा. ७ entangled (opp. to clear) अडकलेला, अडलेला, गुंतागुंत झालेला. [ To FALL F. OF (च्या) अंगावर येणे. ] F.v. t. to defile, to soil (-ची) घाण करणे, मळवणे, नाश करणे, खराब करणे. २ mili. to incrust ( the bore of a gun ) with burnt powder in the process of firing (आवाज काढकाढून तोफेचे तोंड जळक्या) दारूचा गंज राहिल्यामुळे बिघडविणे -खराब करणे. ३ to cover ( a ship's bottom) with anything that impedes its sailing (गलबताच्या इ० तळाशी) अडगळ बांधून गत्यवरोध करणे. ४ to entangle गुंतवणे. ५ to come into collision with (-शी) टक्कर होणे g. of s. F. v. i. to become clogged with burnt powder in the process of firing, as a gun (दारू राहिल्यामुळे तोफेचे तोंड) गंजानें भरणे. २ to become entangled, as ropes गुंतागुंत होणे. Foul'ing pr. p. & v. n. Foul'ed pa. t. & pa. p. Foul n. an entanglement गुंतागुंत f, किचाड n. २ collision (as in a boat-race ) टक्कर f, ठोकर f, Foul n. a