पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1558

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

was transacted and justice dispensed (सार्वजनिक काम करण्याची व सार्वजनिक न्याय देण्याची) सार्वजनिक जागा f. २ the courts of law (as opposed to the parliament) न्यायस्थान n, न्यायांगणn न्यायमंदिर n. Forward (faw'ward) [M. E. forwardes, A. S. forsweard- A. S. fore, before, weard, sig. direction. ] a. near, at the fore part पुढील, पुढचा, आघाडीचा, तोडाजवळील, तोंडाजवळचा, तोंडचा; as, "The F. ship in a fleet." २ (a) ready, prompt तयार, तत्पर, उद्यत. (b) (in an ill sense) too hasty नाचरा, पुढे पुढे करणारा, धांवरा. ३ (a) ardent, eager, earnest उत्सुक, उत्कंठित, उत्साहवान, उत्साही, सोत्साह, धजदार, आतुर. (b) (in an ill sense) less reserved or modest than is proper, bold, impudent धीट, निर्भीड, धृष्ट,अगळिकीचा, उद्दाम, उद्धत, उद्धट. [To BE OFFICIOUSLY F. पुढच्या पुढे करणे-नाचणे. ४ advanced beyond the usual degree आगसलेला, पुढारलेला, पुढे गेलेला, वेळेपेक्षां लौकर तयार झालेला, अकालपरिणत-परिपक्क. ५ advanced towards completion पूर्णप्राय, तयार होण्याच्या बेतांत आलेला, तोंडाशी आलेला. F. v. t. (a) to help onward, to promote टेंका देणे, (ला) हात देणे, (च्या वाढीस) मदत करणे. हातभार लावणे, वृद्धिंगत करणे; as," To F. the growth of plants." (b) to quicken घाईने पुढे ढकलणे. २ to transmit पुढें धाडून देणे, पुढे धाडणे, (पत्र इ.) पाठविणे, पुढ़ें पाठविणे. F. adv. [RIGHT F. सरधोपट. To COME F. पुढे सरकणे, सरसावणे. TO PUT. ONE'S SELF F. आपले घोडे पुढे ढकलणे, पुढे पुढे करणे. ] For'wards adv. (a) onward पुढें, मोहरें, समोर, तोंडापुढच्या बाजूस. (b) progressively (oppo. to backward) उत्तरोत्तर, अधिकाधिक, पुढे पुढे, अघाडीस. For'warder n. a promoter पुरस्कर्ता, सहाय्यकर्ता, प्रवर्तक. २ one who sends forward anything धाडणारा, पुढे पाठविणारा; (com.) a forwarding merchant (माल पाठविणारा व्यापारी) अडत्या, वच्छाद. ३ (book-binding) one employed in forwarding (पुस्तकाची) शेवटची बांधणी करणाराकडे पाठविणारा. For'warding n. the act of one who forwards पुढे पाठविणे n. २ (book-binding) the process of putting a book into its cover, & making it ready for tho finisher पुस्तकावर पुठ्ठा किंवा वेष्टन चढविण्याची पद्धत f. For'wardly adv. पुढे पुढे करून, आतुरतेने, उत्कंठतेने. For'wardness n. promptness तत्परता f, तबारी f. २ advancement, an advanced stage of progress पुढे गेलेली स्थिति f, आघाडी f, अभिवृद्धि f, उत्कर्ष m. ३ ardour, eagerness पुढे पुढे करण्याची हांव f, उत्कंठा f, आतुरता f, उत्साह m. ४ confidence, assurance प्रत्यय m, दृढविश्वास m, असंशय m. ५ want of due reserve or modesty धीटपणा m, धिटाई f, निर्भीडपणा m, घृष्टता f, अमर्यादपणां m, अविनय m, लचाळकी f. ६ prematureness आघाडीची पक्कता f, अकालपक्कता f.