पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1545

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणे. Fore-show' v. t. अगोदर-पूर्वी -&c. दाखवणे. दाखवून देणे, भविष्यसूचन n- अग्रसूचन n- पूर्वसूचन n- &c. करणे g. of o. २ See Foretell. भविष्य करणे -सांगणे. Fore-show'er n. पूर्वी दाखविणारा -दाखवून देणारा, भविष्यसूचक, भविष्यसूची. Fore'-sight n. (R.) foreknowledge पूर्वज्ञान n. २ prudence दूरदृष्टि f, पोक्तदृष्टि f, धोरण n, दूरदर्शित्व n, दूरदर्शिपणा m, पुढची नजर f -विचार m. Fore-skin n. anat. the fold skin which covers the glans of the penis शिश्नशीर्षाच्छादिनी त्वचा f (पुरुषाच्या जननेद्रियाची) पुढची चामडी f -टोपी f, शफाग्रचर्म n. Fore'-skirt n. the front skirt of a garment, in distinction from the train पुढची किनार f. Fore'sleeve n. the sleeve below the elbow कोंपराखालची अस्तनी f. Fore-stall' v. t. to anticipate आगाऊच धारणें -अंदाज करण, आघाडी f. साधणे-मारणे g. of o., आगपाई f. साधणे-करणे g. of o. २ to preoccupy, to get ahead of अघाडी मारणे. ३ (also) (a) to exclude by prior occupation or by measures taken in advance आधीच आक्रमण करून ताब्यात घेऊन दुसऱ्यास मज्जाव करणे. (b) (Eng. law) to intercept on the road, as goods on the way to market ( आगाऊ खरेदी करून ) अटकाव m. करणे. To F. the market to buy or contract for merchandise or provision on its way to market, with the intention of selling it again at a higher price माल बाजारांत चालला असतां पुढे जास्त किंमतीला विकण्याकरिता वाटेंतच त्याची खरेदी करणे. Fore-stall'er n. Fore'-taste v. t. (a) to taste before full possession सत्ता नसतांना आगाऊच उपभोग घेणे; मासला चाखणे, उपभोग m -आदिभोग m -पूर्वानुभव m. घेणे. (b) to anticipate आगाऊ कल्पना करणें -बांधणे with विषयीं of o. २ ( Milton) to taste before another. दुसऱ्याच्या अगोदर चाखून पहाणे. F. n. Foretell' v. t. to predict भविष्य करणे-सांगणे, भाकीत n -भविष्यार्थ m -भवितव्य n. करणे -करून ठेवणे. F. v. i. भविष्य वर्तवणे-सांगणे-कथणे, कथून ठेवणे, अगोदरच कथून ठेवणे, भविष्य-भाविकथन n. &c. करणे. Fore-tell'er n. भविष्यवादी m, भविष्य सांगणारा, भाकणारा, भविष्यकथक, भविष्यद्वक्ता m, दैवज्ञ m. Foretell'ing n. भाकणे n, भाकणूक f, भविष्यकथन n, भाविकथन n. Forethink' v. t. (obs.) to prognosticate भविष्य करणे. Fore'-thought n. prescience, forecast भविष्यज्ञान n, पूर्व विचार m, दूरदर्शन n, दृष्टि f, दीर्घदर्शन n -दृष्टि f, पूर्वज्ञान n. F. a. आगाऊ -अगोदर समजलेला. २ ( hence ) deliberate जाणून बुजून केलेला. Fore'-tooth n. anat. one of the teeth in the forepart of the mouth पुढचा दांत m, सुळादांत m, छेदक m, चौकटीचा दांत m, राजदंत m. Fore'-top n. (a) the hair on the forepart of the head ताळूवरचे केस m. pl. (b) esp. a.