पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1544

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

forepart of the head कपाळावर येणारें झुलुप n, टाळूवरची बट f, भ्रामरक m, भ्रमरालक m, काकपक्ष m (S.)-(of a horse) शेंडी f. २ mech. a linchpin (परत न निघणारी अशा बेताची) निमुळती चपटी खीळ f, (लांकडाच्या सांध्याला मारण्याची) टाळ f. To take time or occasion by the F. not to let slip an opportunity संधि दवडू -वायां जाऊ न देणे, वाहत्या गंगेत हात धुवून घेणे, संधि साधणे. Fore'man n. (a) the chief man of a jury, who acts as their speaker सरपंच m, मोहोरक्या m. (b) an overseer मुकादम m, देखरेख करणारा. Fore'mast n. naut. पुढची डोलकाठी f. Fore'mentioned a. mentioned before पूर्वकथित, पूर्वोक्त, उपरिनिर्दिष्ट, वर -पूर्वी. मागे सांगितलेला, पूर्वोदित, वर म्हटलेला-दिलेला. Fore'milk n. (physiol.) the milk secreted just before or directly after the birth of a child or of the young one of an animal चिका m, चीक m. Fore'most a. first in time, place, rank, dignity, &c. सर्वांपुढला, सर्वांपुढचा, सर्वांपुढील, अग्रिम, प्रथम -पहिल्या प्रतीचा, अग्रवर्ती, अग्रेसर, मोहरचा, मोहरला. Fore'name n. the first or christian name स्व:तचे नाव n. F. v. t. प्रथम -पहिल्याने नामनिर्देश करणे. Fore'named a. पूर्वोक्त, वर म्हटलेला, पूर्वोदित, &c. Fore'noon n. the carly part of the day, from morning till moon पूर्वान्ह m, मध्यान्हाच्या पूर्वीची वेळ f, सकाळपासून दोन-प्रहरच्या मधली वेळ f. Fore'ordain v. t. to appoint beforehand, to predetermine, to predestinate अगोदर नेमून-योजून ठेवणे. २ to predetermine अगोदर ठरवून ठेवणे. Foreordina'tion n. पूर्वयोजना F. Fore'part n. the part most advanced प्रथमचा -पहिला भाग m काळ m, पुढला भाग m, अग्र m, अग्रभाग m, मुख n, तोंड n, मोहर f. [F. AND BACK PART आगापिच्छा m. ] २ beginning सुरवात f, आरंभ m, प्रारंभ m, उपक्रम m. Forepro'mised a. promised beforehand पूर्वप्रतिज्ञात, ज्याबद्दल आगाऊ वचन दिले आहे असा. Fore'quoted a. cited before पूर्वोक्त, पूर्वकथित, पूर्वनिर्दिष्ट. Fore-rank n. front आघाडी f. Fore'reach v.t. naut. (दुसऱ्या गलबताच्या) पुढ़े जाणे. Fore'run v. t. to precede पूर्वी-अगोदर-आधीं जाणें-धांव ठोकणे. २ (a) to introduce as a harbinger आगाऊ सुचविणे. (b) to announce आगाऊ विदित करणे. Fore'runner n. (a) a harbinger पुढें धांवणारा, अग्रगामी, प्राग्गामी, अग्रदूत m (cf. भालदार, चोपदार m). (b) a prognostic अग्रलक्षण n, पूर्वचिन्ह n. २ (obs.) an ancestor' पूर्वज m, पूर्वपुरुष m. Foresee' v.t. to have prescience of भविष्य n -भविष्यार्थ m पाहणे -पाहून ठेवणे-करणे करून ठेवणे -समजणें, अगोदर-पूर्वी-पहिल्यानेच &c. पाहणे -पाहून ठेवणे. Fore-sha'dow v.i. to prefigure आगाऊ नकाशा आंखून ठेवणे g. of o. Fore-short'en v. t. (fine arts) to shorten by drawing in perspective यथार्थदर्शनचित्र घेऊन लहान