पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Dry ( dri) [A. S. dryge, dry. ] a. free from moisture कोरडा, सुका, शुष्क, अनाई. [STIFFLY D.-A WASHED CLOTH: कडक, खडखडीत, चरचरीत, सणसणीत, खडंग. TO BE OR BECOME CRISPLY OR STIFFLY D.CLOTH, PAPER, CROPS, GRASS &c. कडपणे-खडंग वाळणे. D. WEATHER रूक्ष-कोरडी हवा f. D. VEGETABLE सुकी भाजी f, वाळविलेली-वाळवून ठेवलेली भाजी ( हरभरा, गोवारी, &c.), उसरी f. ] २ free from juice or sap not green वाळलेला, सुका, सुकट, शुष्क, नीरस, रसहीन- शून्य. [OLD AND D. VEGETABLE तरडा. intens; as, जून जून तरडा.] ३ not giving mill: भाकड, आटलेली, उडालेली, विसका. [To BECOME DRY उडणे, आटणे, विसकणे. ४ thirsty, needing drink तहान लागलेला, शोष पडलेला, तृषार्त. ५ not shedding tears आसवें नाहींत असा, निरश्रू. ६ of certain morbid conditions, in which there is an entire or comparative absence of moisture सुका (खा), सुकून गेलेला, शुष्क. ७ destitute of that which interests or amuses, barren, plain कोरडा, आळणी, रुखा, रूक्ष, बेकस, बाकस, विरस, नीरस, शुष्क. ८ characterised by quality somewhat severe, grave or hard, hence, sharp, Shrewd पक्का, चलाख, हुशार, पोहोचेल. ९ (hair) करडा, रांठ, भरभरीत, रुक्ष. १० ( bread ) कोरडा, सुका, निकळा, नुसता or निसता. ११. free from rain काेरडा, बिनपावसाचा, पर्जन्याभावाचा, अवर्षणाचा. १२ sarcastic झोंबणारा, टोचणारा, मर्मभेदक. १३ hard, poor, blunt or not savoury रखरखीत, रुखा, रूक्ष. १४ ununctus and crumbly फुसफुशीत, फसफशीत, भुसभुशीत, भसभशीत, फळफळीत, भरभरीत. D. v. t. वाळवणे, सुखवणे, सुकरणे, कोरडा-सुका करणे. [To D. UP शोषणे, सोखणे, आटवणे.] D. v. i. वाळणे, कोरडा होणे, सुखणे. [GRAIN &c. SPREAD OUT To D. वाळवण n, सुकवण n. To D. UP सुखटणे, शोपणे, काेरडा पडणे. ] २ आळणे, आटणे. ३ सुकटणे, सुखा होणे, रस जाणे g. of s. Dry-eyed a. कोरड्या-सुख्या डोळ्यांचा. Dry-land n. खुष्की f, कोरडी-सुखी जमीन f. Dry-nurse n. अंगावर न पाजणारी-केवळ संभाळणारी दाई f. Dry'age n. वाळवण n, सुकणावळ f. २ सुकवळ n, घट f. Dry'ing n. वाळवणे n, सुखवणे n, शुष्कीकरण n. २ शोषणें n, शोषण n, शोष m. Dry'ness n. कोरडेपणा m, सुकेपणा m. २ शुष्कता f, रसराहित्य n, रसाभाव m. ३ कोरडेपणा m, सुखेपणा m, रुक्षता f, निरसता f. Dry-shod adv. without wetting shoes or the feet कोरड्या पायांनी, सुख्या पायांनी, पाय किंवा जोडे भिजल्याशिवाय. Dual (dū'al) (L. dualis-duo, two.) a. expressing or consisting of the number two दोन ही संख्या दर्शविणारा, द्विसंख्याक. D. n. द्विवचन. [D. CONTROL दोनाचा अंमल m- सत्ता f] Dua'lism n. द्विगुणत्व n, द्विधाभाग m, विभागद्वैध n. २ (philos.) a view of man as constituted of two original & independent elements