पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

as matter & spirit जड आणि चैतन्य यांच्या संयोगाने मानवप्राणी बनला आहे असे मत n. ३ (theol.) a system which accepts two gods or two original, principles one good and the other evil द्वीश्वरमत n, द्वितत्वमत n. See Dietheism. 3 the doctrine that all mankind are divided by the arbitrary decree of God into two classes the elect & the reprobate मानवजातीचे पापी व पुण्यवान असे दोन भाग ईश्वरी इच्छेने पडले आहेत असें मत n-वाद m. ४ (physiol. ) the theory that each cerebral hemisphere acts independently of the other वरिष्ठ मेंदूच्या किंवा महामस्तिष्काच्या दोहों शकलांचे व्यापार स्वतंत्र चालतात असे मत n, शकलद्वैध n. Du'alist n. द्वीश्वरवादी m. २ one who administer's two offices दोन अधिकार चालविणारा (अधिकारी). Du'alistic a. Dual'ity n. द्वित्व n. Dual-school मुळामुलींची (एकच) शाळा f. Du'archy n. द्विसत्ताकराज्य n. Dub (dub) [ Connected with old Fr. a-douber, to equip with arms or A. S. dabban, to strike or beat.] to confer Kinghthood upon (-ला) सरदारी देणे. (ह्या शब्दाचा धात्वर्थ मारणे, प्रहार करणे, थापटणे असा आहे. पूर्वी इंग्लंडांत सरदारी देण्याच्या वेळी राजा आपल्या तलवारीचे पानाने भावी सरदाराच्या खांद्यावर हळूच थापट मारीत असे, ह्यावरून Dub शब्दाला सरदारी देणे असा अर्थ आला आहे.) २ to invest with any dignity or new character पदवी देणे. 3 ( obs.) to Ornament or adorn भूषित करणे. ४ to rub or dress smooth (घांसून-पुसून) तुळतुळीत करणे. Dubout (खांच खळगे भरून काढून) जमीन सारखी-सपाट करणे. D. V. t. to make a quick noise (नगाऱ्यासारखा) धब धब आवाज करणे. D. n. (R.) धबका m, घुम्मा m. Dubber (dubur ) [From Hindi. डबा.] डबा m, बुधला m,- लें n, दबडें n, डबडें n. Dubious (dū'-bi-us ) [L. dubiosus, doubtful--L. dubium, doubt; nen. of L. dubius, doubtful, moving in two directions.-L. duo, two.] a. doubtful or not settled in opinion, wavering, undetermined शंकित, साशंक, संशयग्रस्त, डळमळीत-मताचा, द्विधामताचा. २ occasioning doubt, not clear', questionable संशयोत्पादक, संशयजनक, संशयित, अस्पष्ट, संदिग्ध. ३ of uncertain event or issue अनिश्चितपरिणामक, अतर्क्यफलक, ज्याचा परिणाम काय होईल हे कळल नाहीं असा. Du'biously adv. संशययुक्त रीतीने, चलबिचलीने, &c. Du'biousness n. state of being dubious साशंकता f, शंकितता f, साशंकवृत्ति f, भ्रान्ति f. Dubi'ety n. uncertainty, doubt अनिश्चय n, संशयितता f, संशय m. Dubios'ity. n. state of being doubtful संदिग्धता f, संशयप्रचुरता f. २ a doubtful statement or thing संदिग्धविधान n, संशययुक्त भाषण n. Du'bitable a. ( R. ) शंकनीय, संशयास्पद. Du'bitably adv. (R.) Du'bitancy n.