पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६ folded दुहेरी, दुहेरा, दुहिरी, दुडता, दुडती. D. v. t. to increase by adding an equal sum or quantity दुप्पट करणे, द्विगुण-द्विगुणित करणे. २ to fold one part upon another part of (often followed by up) दुणणें, दुमटणे, दुमडणे, दुहेरी करणे, एक घडी घालणें (colloq.), वार्धक्याने शरीराची घडी होणे. ३ to exceed by two fold (च्या) दुप्पट असणें. ४ to pass around or by, to march or sail round भोवताली फिरणे, प्रदक्षिणा-वळसा घालणे; as, "To D. the Cape of Good Hope." 4 mil. to unite as ranks or files so as to form one from each रांगा किंवा तुकड्या जोडणे. ६ to clinch (as a fist) मूठ आवळणे. D. v. i. to be increased to twice the sum दुप्पट-द्विगुणित होणें, दुणावणे, दुणारणे. २ to return upon one's track गेल्या रस्त्याने मागे फिरणे. ३ to play tricks, to use sleights कपट करणें, दगा करणे, डावपेंच करणे-लढविणे. ४ print. to set up a word or words a second time by mistake (एकदां जुळलेला शब्द-मजकूर, चुकीने पुन्हां जुळणे. D. n. twice as much दुप्पट f, दुणी f, दुपटी f. २ (among compositors) a doublet चुकीने दुबार जुळलेला मजकूर m. (among pressmen) a sheet that is twice pulled & blurred दोनदा ओढून चिताड केलेला कागद m. ३ a plait, a fold घडी f, पदर m. ४ a turn or circuit in running to escape pursuers झुकांडी f, गोता m, वांकण n, वळण n. ५ a trick, a shift, an artifice पेंच m, डाव m, शक्कल f, युक्ति f, तोड f. ६ a counterpart प्रत f, नक्कल f, हुबेहुब मनुष्याची आकृति f-प्रतिमा f, मेल्यावर भुताच्या रूपाने दिसणारी आकृात f, छायापुरुष m. ७ a substitute प्रतिनिधी m, बदली m, नट किंवा गवई हजर नसला तर त्याऐवजी जो काम करतो तो m. ८ double beer, strong beer बीअर नांवाची डबल दारू f. (दुप्पट कैफी.) ८ (lawntennis) a game between two pairs of doubles खेळणाऱ्या दोन जोड्यांचा खेळ m; as, "A first prize for D.” D. up v. t. घडी करणे. Double acting a. दोन बाजूंनी काम करणारा, द्विगुणितफलावह दुप्पट काम करणारा. Double-banked a. (बोटींत बसून) दोघां दोघांच्या जोडीने वल्हविलेला. Double-barrelled a. दोन नळ्या असलेला, दुनळी, दोनबारी, दुबारी. Double-bearing a. bot. द्विप्रसव, द्विगुणफल, दोनदा प्रसवणारा. Double-breasted a. डबल छाती असलेला (कोट). Double-charge v. t. दुप्पट दारू भरणे-ठासणे, lit. दुप्पट भार-वजन घालणे. Double-dagger n. (print.) लक्ष पोचविणारे चिन्ह n. Double-dealer n. दुतोंडया, दुटप्पी, मनांत एक व जनांत एक, द्विजिव्ह, दुबोल्या. Double-dealing n. दुटप्पी व्यवहार m-वर्तन n. Double-decked a. naut. दुमजल्याचे (जहाज). Double-decker n. (तोफा उडविण्याचे) दोन मजले असलेले लढाऊ जहाज n, लढाऊ दुमजली जहाज.२ (colloq.) टप्प्यावर बसण्याकरितां जागा असलेली भाडोत्री गाडी f. Double-dyed a. दोनदां रंग दिलेला, खूब रंग दिलेला, २ पूर्ण, पुरा,