पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अट्टल; as, "A D.dyed villain." Double-eagle n. वीस डॉलरचे नाणे n. Double-edged a. दोहोंकडून धार असलेला, दोन कांठांचा. २ (fig.) दोन अर्थ होणारे (प्रमाण n.). Double-gild v. t. दुहेरी मुलामा देणे. Double-handed a. दोन हात असलेला. २ कपटी, फसव्या. Double-headed a. दोन-डोक्यांचा. Double-hearted a. दगलबाज, विश्वासघातकी. Double-letter n. दुप्पट हांशील लागेल असे टपालचे पत्र n. Double-lock v. t. दोन कांट्यांचे कुलूप लावणे, दोन आडण्यांनी-आडसरांनी लावणे, दुप्पट मजबुतीने लावणे-बंद करणे. Double-meaning a. यर्थी, कपटी. Double-minded a अनिश्चित, दोन-मनांचा, फुटक्या मनांचा, द्विमनरक. Double-natured a. द्विस्वभाव. २ द्विधातुक, उभयविध. Doub'leness n. दुटप्पी वर्तन n, दुहेरीपणा m, कपट n. Double Play n. ज्या खेळांत दोन गडी एकदम भरतात-वाद होतात असा खेळ m. Double pica n. दुप्पट पायका टाईप m. Double-point n. math. द्विगुणबिंदु m. Double-quick a. & adv. mili. त्वरितगतीचा, अति त्वरित. Double-quick n. अति जलद गति f. Double-quick v. t. & v. i. अति जलद चालविणे-चालणे. Double refraction n. द्विधा वक्रीभवन n. Double salt v. द्विभस्मिक लवण n. (भस्म base). Double-shade v. t. mili. अंधार-काळोख दुप्पट करणे. Double-standard n. द्विचलनपद्धति f. Double-star n. जवळ जवळचे दोन तारे m. pl. तारायुग्म n, डोळ्यांनीच पाहिले तर एक आहे असे दिसणारे तारायुग्म n, दुहेरी तारा m. Double-time n. mili. Same as Double-quick. Double-tongued a. द्विजिव्ह, अनेकजिव्ह, दतोड्या, एकाच गोष्टीविषयी निरनिराळ्या वेळी निरनिराळं बोलणारा. २ दगेखोर, कपटी, घातकी. Doubled a. दुप्पट केलेला, द्विगुणित, दुघडी, दुणता, दुडता, दुमडता, दुहेरी. Doub'ler n. दुप्पट करणारा. २ लपंडाव करणारा. ३ कापसाचे किंवा रेशमाचे दोन अथवा अधिक ताणे-धागे एक ठिकाणी करून बसविणारा कामकरी m-यंत्र n. ४ elec. विद्युज्जागृति द्विगुणित करणारे यंत्र n, द्विगुणकर m. Doub'ling n. दुप्पट करणे n. २ दुमड-मोड f- घडी f. ३ पेंच m, डाव m. ४ वक्रगति f, पळतांना एकदम मारलेला हिसका m-घेतलेलें वळण n. Double rule of three बहुराशिक-पंचराशिक प्रमाण n. Doublet ( dub'-let) (M. E. dobbelet, O. Fr. doublet, an inner ( double ) garment.-Fr. double, double. with suffix et).] n. two of the same kind, a pair, a couple जोडी f, दुक्कल f, युग्म n, युगल n. २ one of o things precisely alike or in some way identical, one of a pair or couple, a duplicate सारख्या वस्तूपैकी एक f, प्रतिरूप n. ३ a word unintentionally doubled or set up (त्याच शब्दाची) द्विरुक्ति f. ४ बंडी (आंतली) f, cf. बाराबंदी f, बंडी f. ५ pl. the same number turning up on both the dice at, a throw ज्यांत दोन्हीं फांशांवरील अंक सारखेच असतात असे दान n; बारा pl, दुढ्ढि s, बेती s. वगैरेसारखें