कल्पना काही मांडली नाही. जगभरात उसाचे पीक हे पावसाच्या पाण्यावर घेतले जाते. कालव्याच्या पाण्यावर ऊस पिकविणारा भारत हा एकमेव देश आहे. त्यामुळे ज्या-ज्या राज्यात ऊस मोठ्या प्रमाणावर पैदा होतो त्या-त्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. दुसऱ्या जिल्ह्यातील पाणी आपल्या जिल्ह्यात वळवून आणण्याचा खटाटोप मोठे-मोठे नेते करतात. खरे म्हणजे भारताचा ईशान्य भाग जेथे निसर्गतः बांबू मोठ्या प्रमाणात तयार होतो, त्याच भागात ऊस हे बांबू जातीचे पीक घेतले गेले तर पाण्याचे दुर्भिक्ष भेडसावणार नाही आणि ईशान्य भारतातील सर्व तहेच्या दुर्भिक्षाचे प्रश्नही सुटू शकतील.
भारताला एक विख्यात अर्थतज्ज्ञ पंतप्रधान म्हणून लाभला आहे, पण त्याचे मुख्य लक्ष वित्तीय व औद्योगिक संस्थांच्या सुधारणांकडेच आहे.
दोन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊनही पंतप्रधानांचे लक्ष शेतीच्या प्रश्नाकडे वळत नसेल तर मग त्यांचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी करावे तरी काय?
(दै. लोकसत्ता दि. २३ जाने. २०१३)