पान:रससूत्र (Rasasutra).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



कसे शक्य आहे?) सोडविला जातो. अनुकरणरूप नाटय आणि अनुकार्य हयांचे वास्तविक असण्याची गरज संपते. (उदा. अग्नी व धूर ह्यांचा संबंधाप्रमाणे अनुकार्य व नाटय ह्यांचा संबंध असावा लागत नाही.) अनुकरणात सादृश्यता, सजातीयता, असणे हा मुद्दा गौण होतो व अनुकार्याचा आभास स्थायी भावाची उत्पत्ती महत्त्वाची होते. हा चित्र-तुरग-न्याय घोड्याच्या चित्रापुरता मर्यादित नाही. हे चित्र हसणाऱ्या मुलाचेही असू शकते. हा मुलगा अपरिचित असला तरी त्यामुळे चित्र पाहाण्यास व ते हसणाऱ्या मुलाचे चित्र आहे हे समजून घेण्यास बाधा येण्याचे कारण नाही. आता ह्या चित्रात हसत कोण आहे? चित्र तर रंगरेषांनी बनलेले आहे. ह्या रंगरेषा हसू शकत नाहीत. ज्यांचे हे चित्र आहे तो माणूस परिचित असला तरी त्याच्या हास्याचे अनुकरण कशामुळे झाले आहे? आणि हे चित्र काल्पनिक पुरुषाचेही असू शकेल. उलट चित्र असेही असेल की ते पाहून प्रेक्षकांना हसू येईल. पण चित्रात कुणी हसणार नाही. हया चित्रात फक्त अनुभावाचे अनुकरण आहे असे जरी म्हटले अनुभाव हे भाव व्यक्त करू शकतात असे मानणे भाग आहे. म्हणून जड माध्यमाच्या आधारे अजड (चेतन) भावाचे अनुकरण शक्य मानले पाहिजे, की तिथे सत्य, असत्य, भ्रम ही परिभाषा अप्रस्तुत मानली पाहिजे आणि ही प्रतीती विलक्षण असल्यामुळे त्या ठिकाणी जड चेतन भेदही अप्रस्तुत मानला पाहिजे. या चित्र-तुरग‌- न्यायवाद्यात जे विज्ञानवादी असतील ते असेही सांगणार की, खरोखरी बाह्य जडजगत परमार्थतः अस्तित्वातच नाही म्हणून जड माध्यमाने चेतनाचे अनुकरण शक्य आहे का? हा प्रश्नच तत्त्वतः उपस्थित होऊ शकत नाही.
 चित्र-तुरग-न्यायवादी आपले विचार कसे मांडीत असतील हयाचा हा एक स्ठूल काल्पनिक आराखडा आहे. हा आराखडा बौद्ध तत्वज्ञानाचे सूक्ष्म ज्ञान असणारे लेखक अधिक सूक्ष्म करू शकतील. माझ्या दृष्टीने हया नेय्यायिक परंपरेच्या चिंतनाला, काव्यशास्त्र-विकासात फार महत्त्वाचे स्थान आहे. हया पद्धतीने विचार करणारे शंकुकापूर्वी असतील, त्याच्या नंतरही असतील. हया चित्रतुरग न्यायवाद्यांच्या वर्तुळातून काही महत्त्वाच्या कल्पनांचा उदय झालेला आहे. अलौकिक अनुमानाची कल्पना ही अशी दिसते. वैदिक न्यायातील अलौकिक प्रतीती व तिला आधार अनणारे अलौकिक अनुमान, हयाची कक्षा सत्यासत्य निश्चय आहे. बौद्धांनी आपणांस अशा एका ठिकाणी आणले आहे की जिथे कला विचारात सत्यासत्याचा प्रश्न अप्रस्तुत होतो.हेच त्यांच्या अलौकिक प्रतीतीचे स्वरूप आहे. आज ह्या प्रवाहाचा फक्त शंकुक ज्ञात आहे. म्हणून श्रेय त्याच्या नावे मांडले जाते इतकेच. हया वर्तुळाच्या प्रभावामुळे पुढच्या काही नव्या कल्पना साकार होऊ शकल्या. साधारणीकरण ही अशी एक कल्पना आहे. चित्रांच्यासाठी, मूळ अनुकार्याची गरज नसल्यामुळे रामाकडे पाहून रामाचे चित्र काढण्याची गरज नसते. मी काढलेले रामाचे चित्र मूळच्या


६७