पान:रमानाटक.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अबलांचे प्राबल्य झालें. तपश्चर्येचा लोप झाला. असे अनेक प्रकार होऊन सर्वस्वी जगरहाटी क्षीणतेस आली.
 असो, वरील विषय लिहिण्याचा मुख्य उद्देश इतकाच की, पुढे लिहिलेल्या नाटकांतील पात्रे सत्यास- त्यतेचा विचार कितपत करतात हे स्पष्ट दर्शविलें आहे. शिवाय होणारे परिणामही सहज लक्ष्यांत यावेत आणि त्यापासून सर्वत्रांनी पराङ्गमुख व्हावें ह्मणून हे नाटक लिहिलें आहे.
 या नाटकांत स्त्रिया ह्या पुरुषांस कशी मोहनी घालतात व प्रसंगी कसें वर्तन करतात याचे यथातथ्य वर्णन केले आहे, तरी सर्वत्र वाचकजनांस माझी विनय- पूर्वक प्रार्थना आहे की, माझ्या अल्पमतीनें रचलेल्या यो नाटकास मान देऊन स्त्रियांच्या चापल्यवृत्तीचा विउक्षण मासला हृदयांत ठेवतील ही आशा आहे.

 

तासाबा पुणेकर

पुस्तककर्ता.