पान:रमानाटक.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना

.

 पूर्वीपासून चालत आलेल्या ज्या रीतिभाती त्या हल्लींच्या दिवसाला फार दूषणीय झाल्या आहेत, याचे कारण विद्यावृद्धि विशेष झाली त्यामुळे सर्वत्रांस मीपणाची गोडी लागली. आपल्या पूर्वजांनी कोणतीं सत्कृत्ये केली इकडे मुळींच लक्ष नसून उलट पात- काचा प्रचार वाढत चालला. विद्या फार जरी केली तरी तो गुणवान असे ह्मणतां येत नाही. कारण शिक- लेल्या विषयाचे स्पष्टीकरण जर त्याच्या मनांत भरलें नाहीं, तर तो विषय त्याचे हातून महात्वाचा होणार नाहीं. उदाहरण, जर आपण एखादें गांव पाहिलें नाहीं आणि त्या गांवाचें यथातथ्य वर्णन मुखोद्गत केलें ह्मणून ज्यानें तो गांव पाहिला असेल त्याची तो बरोबरी करूं शकणार नाहीं. तशी सर्वांशी हल्लीं स्थिति झाली आहे.
 एका सूत्रामध्ये नानारंगांची गुंफलेली फुले जशी शोभा देतात तशी सूत्र काढून घेतल्यावर विखुरली असतां शोभा देत नाहींत. तसें कलीचा प्रादुर्भाव झाल्यापासून सत्य नाहींसें होऊन असत्याचा प्रचार फार झाला. धर्माचा व्हास होत चालला. पड्रिपु वलवान झाले. देवादिकांच्या पूजनाचा कंटाळा येऊं लागला. मातापितरांची निर्भत्सना होऊं लागली.