भुजंगनाथ एकमेकांच्यासमोर आणून उभे केले आहेत. हे करण्यात देवलांचा हेतू शारदा-भुजंगनाथाची भेट घडविण्यापेक्षा भुजंगनाथ हास्यास्पद करून दाखविणे हाच अधिक दिसतो. या भेटीच्या प्रसंगी भुजंगनाथाचे म्हातारपण, त्याचे बहिरेपण, त्याची खोटी दातांची कवळी या साऱ्या बाबी उघड होतात. हे भुजंगनाथाचे 'वस्त्रहरण' शारदेपेक्षा प्रेक्षकांच्यासाठीच अधिक आहे. शारदेच्या तोंडून वये आजोबा माझे दिसता' ही गोष्ट देवल भुजंगनाथाला ऐकवतातच.
शेवटी, भुजंगनाथ घृणेच्या व हास्यास्पदतेच्या भडक रंगात किती रंगवावा? हा म्हातारा एकीकडे चिक्कू तर दुसरीकडे सुंदर मुलगी मिळवण्यासाठी हजारो रुपये उधळणारा उधळ्या दाखविला आहे. तो एकीकडे लंपट तर दुसरीकडे अगदीच भित्रा, रंगेल आहे. लंपट माणसे काही प्रमाणात निर्लज्ज होतात. ती उधळीच असतात, चिक्कू नसतात. ही संगती देवलांना मान्य नाही. परस्परविसंवादी ताणांनी ताणलेला भुजंगनाथ हा एक कृत्रिम बाहुला आहे. त्याला स्वतःची अशी कोणतीही शिस्त नाही. तो चिक्कू असेल तर त्याने लग्नावर पैसे उधळू नयेत. तो रंगेल म्हातारा असेल तर वेषपालट, गावपालट करण्याची, चार वर्षे अविवाहित राहण्याची शक्यता संपते. मूळ म्हाताऱ्या लंपटांना विवाहाची फारशी गरजच नसते. भुजंगनाथाला निश्चित असा आकारच येत नाही. तो पोकळ असल्यामुळेच जास्त नाद करतो ही वस्तुस्थिती आहे.
भद्रेश्वर दीक्षित : भडक रंग
हा काल्पनिकाचा पसारा इथेच संपत नाही. लग्न जुळविणे हा ज्याचा चरितार्थाचा प्रमुख उद्योग आहे असा एक भद्रेश्वर दीक्षित देवलांनी उभा केला आहे. हा भद्रेश्वर पुन्हा काल्पनिकच आहे. हिंदू समाजात लग्न जुळविणारे मध्यस्थ असत. ते पुष्कळदा लबाड असत. दोन्ही बाजूंनी पैसे खाणारेही असत. ही गोष्ट खरी आहे, पण धंदा म्हणून लग्ने जुळविणे हा परंपरागत व्यवसाय कधीच नव्हता. मुद्दाम श्रीमंत बिजवर हेरायचे, त्यांच्याकडे सोंगाडे ज्योतिषी पाठवायचे, बिजवरांना विवाहाला प्रवृत्त करायचे, त्यांना तरुण देखण्या मुली मिळवून द्यायच्या, यासाठी दलाली म्हणून काही हजार रुपये मिळवायचे, अशी पद्धत प्राचीन समाजात रूढावलेली नव्हती. ते व्यक्तिगत पाप असू शकते, तो व्यवसाय नव्हे. काल्पनिक कथा-कादंबऱ्यांतून वावरणारे कोणत्याच पापाची खंत
पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/29
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८ / रंगविमर्श