पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्व धन तू रतिसेनेकडे नेऊन ठेवलेस आणि तिने स्नानाचे निमित्त करून साडी नेसवून तुला अशोकवनातील पुष्करणीवर नेऊन सोडले?
 बरे मग ? तेथील रक्षकांनी चोरवाटेने तुझी सुटका केली ? ज्या नगरीत आपण वैभवाने मिरवलो, तिथे दीर्घ दारिद्र्य कसे घालवावे या चिंतेत आहेस व म्हणूनच वनात जातोस ? फार वाईट बाबा, अति वाईट अतिलोभ हा वेश्यांचा स्वभाव असतो. सर्पविष उतरविणे महाऔषधींना शक्य असते. जंगली हत्तींच्या विळख्यातून, फार काय मगरीच्या दाढेतूनही कधीकधी माणूस सुटतो, पण ह्या वेश्यारूपी वडवानलातून जिवंत सुटणेच कठीण. मित्रा, मला कडकडून भेट तू जिवंत सुटलास हेच फार झाले.
 बरे ! मला हे सांग, तुझ्या दुःखाचे मूळ कोण ? आई की लेक ? काय म्हणतोस, ती थेरडीच कुटिल आहे आणि रतिसेनेचे तुझ्यावर प्रेम आहे ? ठीक, ठीक. रतिसेनेची व तुझी भेट करून देऊ ? तिच्याशिवाय जगणे कठीण ? ठीक, ठीक. अरे, रडू नकोस. पूस ते डोळे. आता तू जा. मी नंतर तुझा प्रश्न सोडवतो.
 काय लबाड आणि धूर्त पहा ह्या वेश्या ! दुष्ट राजे ज्याप्रमाणे सारे काही मंत्र्याच्या अंगावर ढकलून मोकळे होतात, तशा या आईवर दोष लादून मोकळ्या. आणि हा लुच्च्यांचा गुरू. तपस्वी २९झाला तरी ‘प्रेम आहे' म्हणून रडतो.

 (परिक्रमा) वसंतवनातील कोकिळेप्रमाणे कोण मला बोलवीत आहे ? अरे, ही प्रियंगुसेना ! थांब, थांब, आलोच. काय, प्रणाम करतेस ? पोरी, माझा आशीर्वाद घे.
 “आपल्या प्रियकराला मृदू लत्ताप्रहाराने रतिशय्येवर दूर ढकलणारी तू. त्याच्या अनावर आसक्तीत तुला घडी पडो. आपल्या पुष्ट जघनाने सुखी हो.”
 पोरी, तुझ्या या थकलेल्या मांड्यांना सुगंधी तेलाची मालिश कुणी केली ? हे भद्रमुखी, अनलंकृत राजहत्तिणीसारखी शोभिवंत तू. हे तुझे स्वाभाविक रूप ज्याने पाहिले नाही, तो ठकला असेच म्हटले पाहिजे.
 मोत्यांनी भूषविलेली, नखक्षतांनी मढविलेली, अंगरागाची उटी चर्चिलेली, बावऱ्या डोळ्यांची तू. तलम वस्त्राखाली यौवनाच्या उबेने पुष्ट झालेले स्तन धारण करणारी तू. तुला पाहून तर मदनाचे मन बिथरून जाईल.
 काय म्हणतेस? माझे बोलणे कानाला गोड वाटले ? अरे, ही खुषामत सोड

२४६ / रंगविमर्श