पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १४ वे दिवाकरांची नाट्यछटा आणि तिचे प्राचीन रूप : भाण नाट्यछटाकार, दिवाकर (शं. का. गर्ग, १८८८-१९३१) हे मराठी वाङ्मयातील एक देदीप्यमान रत्न मानले पाहिजे.एखाद्या लेखकाबरोबर वाङ्मयप्रकार जन्माला यावा, लोकप्रिय व्हावा, त्यामुळे त्या लेखकाच्या अनुकरणाची लाट उसळावी, पण तो वाङ्मयप्रकार हाताळणे मात्र कोणास जमू नये असा प्रकार वाङ्मयाच्या जगात क्वचितच घडत असतो. दिवाकरांच्याबाबत हा प्रकार घडलेला आहे. त्यांच्यापूर्वी मराठीत नाट्यछटा नव्हतीच आणि त्यांच्यानंतर या क्षेत्रात विचारात घेण्याजोगे दुसरे नावही दिसत नाही. दिवाकरांची नाट्यछटा प्रथम प्रकाशित झाली, या घटनेला आता सुमारे साठ वर्षे होत आहेत. साठ वर्षांपूर्वीच्या मराठी लेखकांचे इतर वाङ्मयप्रकारांतील लिखाण पुष्कळंदा शिळे वाटते, पण दिवाकरांची नाट्यछटा अजून शिळी वाटत नाही. तिचा ताजेपणा आणि सौंदर्य अजूनही अबाधित उरलेले आहे. . तसे पाहिले तर दिवाकरांच्या नाट्यछटांची संख्या फारच थोडी आहे आणि या लेखनाच्या बहराचा काळही थोडासाच आहे. ऐंशीपेक्षा कमी पृष्ठांच्या मर्यादेत हा सगळा एकावन नाट्यछटांचा संसार आवरला गेलेला आहे. हे सारे लिखाण दिवाकरांच्या तारुण्याच्या ऐन उदयकाळातील आहे. त्यांची पहिली नाट्यछटा इ.स. १९११ च्या सुमारास लिहिल्याची नोंद सापडते. त्या वेळी दिवाकर बावीस वर्षांचे होते. यानंतरच्या दोन-तीन वर्षांत त्यांनी बेचाळीस नाट्यछटा लिहिल्या. इ.स. १९१३ पासून या नाट्यछटा प्रकाशित होऊ लागल्या. पुष्कळ नाट्यछटांचे प्रकाशन तेव्हा कीर्तीच्या शिखरावर असलेल्या 'केसरी'मधून झाले होते. इ.स. १९१३ नंतर पुढे अकरा वर्षे नाट्यछटाकार दिवाकरांची नाट्यछटा आणि तिचे प्राचीन रूप :माण / २२९