पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८ )
हर्ष वाटतो.

१. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो,
माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो.
२. येशू तारितो हो, मला येशू तारितो,
यामुळेच माझा जीव बहु आनंदतो.
३. दया करितो हो, येशू दया करितो,
यामुळेच माझ्या मनीं हर्ष भरतो.
४. प्रेम दावितो हो, येशू प्रेम दावितो,
प्रेमानेंच लहानथोरां तो बोलावितो.
५. प्रिय वाटतो हो, येशू प्रिय वाटतो,
माझें तन, मन, धन त्याला अर्पितों
६. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो,
माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो.