पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३ ) थँचर व स्विल या लेखकांच्या 'युरोपचा इतिहास' या इंग्रजी भाषेंतील ग्रंथाचें भाषांतर करण्यास त्यां पुस्तकाचे प्रकाशक जॉन मरे यांनी परवानगी दिली याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडेच. प्रस्तुत पुस्तक लिहितांना इंग्लिश, जर्मन, फ्रेंच वगैरे युरोपियन भाषां- तील विशेषनामांचा मूळचा उच्चार व मराठी भाषेंत रूढ झालेले कांहीं उच्चार यांमध्यें बरीच तफावत आढळून आल्यामुळे फारच अडचण भासूं लागली; परंतु मूळचा उच्चारच होतां होईतों कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा असें वाटून तसे उच्चार दिले आहेत. येथील आर्यभूषण छापखान्याचे मॅनेजर यांनी अत्यंत महत घेऊन पुस्तक सुबक व लवकर छापून दिल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहें. प्रस्तुत पुस्तकासंबंधी माझे मित्र रा. त्रिंबक रामचंद्र गद्रे, बी. ए., यांनीं उपयुक्त सूचना केल्या त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. १ जानेवारी १९२०. } परशराम हरी बर्वे.