पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. 110 पांच वर्षांपूर्वी ता. २८ जून १९१४ रोजीं आस्ट्रियाचा राजपुत्र फँझ फर्डिनंड याचा आस्ट्रियन साम्राज्यांतील बोस्निओ प्रांतांत खून झाला ! खुनी मनुष्यास तात्काळ पकडण्यांत आलें, पण या खुनाचा बारकाईनें तपास करतांना हा खून कांहीं कटवाल्या मंडळीच्या प्रेरणेनें करण्यांत आला असून या कटाचा उगम सर्व्हियामध्यें असल्याचें आढळून आल्यामुळे ता. २३ जुलै रोजीं आस्ट्रियानें या कटासंबंधीं सर्व्हियाकडे एक निर्वाणीचा खलिता धाडून चार दिवसांच्या आंत उत्तर देण्याविषयीं फर्माविलें. कटवाल्या मंडळीस पकडून त्यांना योग्य शिक्षा व्हावी या हेतूनें आस्ट्रियानें केलेली मागणी न्याय्य असली तरी आस्ट्रिया- कडून आलेल्या खलित्यांतील गोष्टी कोणत्याही अटी न घालतां मान्य करणें म्हणजे आपल्या स्वातंत्र्यासच कमीपणा आणणें होय असें सर्व्हि- यास वाटूं लागलें. ठरलेल्या मुदतीच्या आंत आपल्या निर्वाणीच्या खलित्यास उत्तर आलें नाहीं हें पाहतांच आपणास जर्मनीचें पूर्ण पाठबळ मिळेल असें वाटून आस्ट्रियानें २८ जुलै रोजी सर्व्हियाविरुद्ध लढाई पुकारली ! या- नंतर आस्ट्रियास मदत करण्यास जर्मनी ( १ आगस्ट ), सर्व्हियाच्या बाजूनें रशिया ( ३१ जुलै ), फ्रान्स ( २ आगस्ट ) व ब्रिटिश साम्राज्य ( ४ आगस्ट ) हीं राष्ट्र व तदनंतर कांहीं दिवसांनीं इटली, टर्की, जपान, अमेरिका वगैरे राष्ट्रं या युद्धांत पडल्यामुळे युद्धाचें क्षेत्र विस्तृत होऊन तें सर्व जगभर पसरलें ! अशा रीतीनें आस्ट्रियाच्या राजपुत्राच्या खुनाचें निमित्तकारण उपास्थित होऊन थोडे दिवस झाले नाहींत तोंच हें युद्ध सर्व जगभर भडकून त्यामध्यें मोठमोठीं बलाढ्य राष्ट्र सामील झाल्यामुळें या महायुद्धाचीं कारणें कोणतीं, महायुद्धापूर्वी युरोपियन राष्ट्रांचे परस्पर संबंध कशाप्रकारचे होते, व त्यांची कसकशी उत्क्रान्ति .