पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रशियाचें पूर्ववृत्त. प्रकरण ११ वें. रशियाचा अरुणोदय. तर व मोंगल लोकांच्या अमलाखालीं बरींच शतकें खितपत पडले- 'ल्या रशियाचे न्युरीक घराण्याच्या नेतृत्वाखालीं पहिल्याप्रथम करण झालें. रशियन लोकांनी हलके हलके ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता, तरी केवळ धार्मिक बाबीव्यतिरिक्त इतर युरोपियन राष्ट्रांशीं त्याचा कांहचि संबंध नसल्यामुळे रशियन लोकांच्या मनावर पाश्चात्य संस्कृतीचा कांहींच परिणाम झालेला नसून त्यांचें पूर्वीचें पौर्वात्य वळण व मोंगली आचार- विचार बरींच शतकें कायम होते. सरतेशेवटीं तिसऱ्या इव्हानच्या कार- कीर्दीत राशयन लोकांची पारतंत्र्यांतून सुटका झाली व ४ थ्या इव्हानच्या अमदानींत तर ( १५३३ - ८४ ) रशियानें आपली सत्ता इतरत्र वाढ- विण्याची खटपट केली. तार्तार लोकांकडून इव्हाननें आस्ट्राशान हा प्रांत जिंकून घेतल्यावर रशियाची दक्षिण मर्यादा कॅस्पीयन समुद्रापर्यंत जाऊन भिडली. १५९८ मध्यें रशियावर राज्य करणारें ज्युरीक घराणें संपुष्टांत येऊन - रशियांत बेबंदशाही माजली; तेव्हां या संधीचा फायदा घेऊन रशियाचा प्रदेश आपल्या ताब्यांत द्यावा असें रशियाच्या शेजारी असलेल्या पोलंड व स्वीडन या राष्ट्रांना वाटून त्यांचे त्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. अशा प्रकारें परराष्ट्रांचा रशियावर डोळा आहे हें पाहतांच कांहीं देशाभिमानी पुरुषांनीं एक राष्ट्रीय पक्ष निर्माण केला; व आपल्यांतीलच मायकेल रोमॅनॉफ नांवाच्या एका रोमॅनॉफ घराणें. पुरुषास गादीवर बसवून ( १६१३ ) रशियाचें अंतस्थ बंडाळीपासून व