पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण १० वें . ] वर राज्य करणाऱ्या हॅप्सवर्ग घराण्याची स्थिति फारच चमत्कारिक झाली होती ! महमद किप्रलिज, अहमद प्रिलिज, कारा मस्टाफा या कर्तृत्ववान् प्रधानांच्या प्रेरणेनें आटोमन टर्कीचा एकसारखा उत्कर्ष होत असून, पूर्व व दक्षिण युरोपकडून टर्कीच्या विस्तृत पावणाऱ्या सत्तेस थोपवून धरण्याची सर्व जबाबदारी आस्ट्रियावर पडली होती इतकेंच नव्हे, तर आपल्या साम्राज्यांतील हंगेरीमधील मेगेआर लोकांचें बंड मोडून टाकण्याकडे बादशहा लिओपोल्ड याचें सर्व लक्ष वेधून गेल्यामुळे लुईच्या महत्त्वाकांक्षेस त्याजकडून अडथळा येईलसा संभव दिसत नव्हता. या - खेरीज लुईनें पोलंड, जर्मनीमधील लहान लहान संस्थानें, स्पेन, इंग्लंड वगैरे ठिकाणी आपले वकील ठेवून आपल्या मुत्सद्देगिरीनें फ्रान्सचा दरारा व वर्चस्व सर्वत्र प्रस्थापित केलें होतें. परंतु १४ व्या लुईच्या या अमर्याद महत्त्वाकांक्षेनें युरोपियन राष्ट्रं चिडून जाऊन त्यांनीं त्याजविरुद्ध मोठा संघ स्थापन केल्यामुळेंच लुईची महत्त्वाकांक्षा सफल न होऊन त्यास आपला पराभव कबूल करावा लागला ! अशाप्रकारें लुईच्या अमदानीच्या शेवटीं शेवटीं सर्व युरोपशी झुंझ करावी लागून फ्रान्सला अपयश गेलें, तरी तत्कालीन इतर युरोपियन राष्ट्रांशीं तुलना केल्यास फ्रान्सनें आपलें श्रेष्ठत्व कायम ठेवलें होतें हें आपणास कबूल करावें लागेल.. लुईनें व्हर्सेल्स येथें स्थापन केलेला दरबार म्हणजे इतर युरोपियन राजे -- रजवाड्यांस अनुकरणीय गोष्ट होऊन राहिली होती ! फ्रान्समधील चाली- रीति, तेथील पोषाख, तेथील कलाकौशल्य यांचें आपण अनुकरण करावें असें युरोपमधील प्रत्येक राष्ट्रांतील पुरुषांस वाटत असे ! लुईच्या अमदानीत कॉर्नली, मोलिएर वगैरे नाट्यकवि निर्माण होऊन त्यांनी आपल्या जगमान्य कृतींनीं वाङ्मयविषयक बाबतींतही फ्रान्सची कीर्ति सर्वत्र पस- रली असल्यामुळें, तत्कालीन युरोपियन राष्ट्रांस फ्रान्सबद्दल आदर वाटावा. यांत कांहींच नवल नव्हतें ! फ्रान्सचें वैभव.