पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ वें. ] जर्मनीतील तीस वर्षे टिकलेलें धर्मयुद्ध. ११३ फ्रान्स युद्धांत भाग घेतें. · कोणी समर्थ झाला नसता. परंतु १६३४ च्या फेब्रुवारी महिन्यांत कांहीं कटवाल्या मंडळींनी त्याचा वध केला असल्यानें बादशाही फौजेचें आधि- पत्य अननुभविक सेनापतीस यावें लागून प्रॉटेस्टंट पंथीय सैन्याचा पूर्णपणे फडशा पाडतां आला नाहीं. इकडे स्वीडिश सैन्याचा पराभवच होत आहे हें पाहून आपण या युद्धांत उघड रीतीनें भाग घ्यावा असें फ्रान्सचा मुख्य प्रधान रिशल्यू यास वाटूं लागलें. इतके दिवस फ्रान्सनें स्टाव्हसला केवळ पैशाचीच मदत केलेली होती, परंतु आतां फ्रेंच सैन्य पाठवून जर्मनीच्या धर्मयुद्धांत हात घालण्याचा त्यानें निश्चय केला. फ्रान्सकडून सैन्याची मदत येतांच या युद्धाचे पूर्वीचें मर्यादित क्षेत्र विस्तार पावून या युद्धाचा वणवा सर्व युरोपभर भडकला. जर्मनीमधील रोमन कॅथलीक व प्रॉटेस्टंट या दोन पंथांमधील कलह बाजूलाच राहून युरोपमधील वर्चस्वासंबंधीं फ्रान्सवर राज्य करणारें बोरबोन घराणें, व आस्ट्रियावर राज्य करणारें हॅप्सवर्ग घराणे यांच्यामध्यें झुंज सुरू झाली ! फ्रान्स व आस्ट्रिया यांच्या ताब्यांत युरोपमध्यें निरनिराळ्या ठिकाणीं बराच मुलूख असल्यामुळे या युद्धाच्या ज्वाळा तात्काळ त्या प्रांतांतूनही डोकावूं लागल्या; व जर्मनी- प्रमाणे इटली, नेदर्लंड हे प्रांत देखील युद्धक्षेत्रांत समाविष्ट झाले. फ्रान्सने या युद्धांत भाग घेतल्याबरोबर आस्ट्रियाची स्थिति फारच चमत्कारिक झाली. उत्तरेकडून स्वीडनचे सैन्य व दक्षिणेकडून फ्रान्सचें सैन्य जर्मनी- वर चालून येत होतें. जर्मनीच्या बादशहानें स्पेन व नेदर्लंड येथून कुमक मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु या दोन्ही प्रांतांसही फ्रान्सकडून शह असल्याने तेथूनही सैन्य येऊ शकलें नाहीं ! अशारीतीनें बाद- शहास दुसरीकडून कोठूनही सैन्याची मदत न मिळाल्यामुळे आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावरच अवलंबून रहावें लागलें, व हॅप्सवर्ग घराण्याचा व बादशाही सत्तेचा पराभव होऊं लागला ! इतकी वर्ष चाललेल्या धुमश्चक्रीनें जर्मनीची स्थिति अगदींच निकृष्टावस्थेत जाऊन पोहोंचली होती. देशांतील उद्योगधंदे नाहींसे