पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण लागला. अशा प्रकारें स्टाव्हसचा पराक्रम पाहून आपले संरक्षण करण्या- साठीं वालेनस्टाईनला पुनः बादशाही फौजेचें आधिपत्य यावें असें बाद- शहा २ रा फर्डिनंड यास वाटून त्याप्रमाणें त्यास विचारण्यांत आलें. वालेनस्टाईनने पहिल्याप्रथम या विनंतीचा अनादर केला होता, परंतु एकंदर परिस्थितीचा विचार केल्यावर आपण व्हिएन्ना राजधानीच्या संरक्षणार्थ गेलों नाहीं तर आस्ट्रियाची कांहीं धडगत लाग- णार नाहीं हें पाहून त्यानें बादशहाच्या विनंतीस रुकार दिला. वालेनस्टाईनला सेनापतिपद पुनः मिळतें... वालेनस्टाईननें बादशाही फौजेचें आधिपत्य स्वीकारतांच, पूर्वीचे अनेक सैनिक त्यास येऊन मिळू लागले. १६३२ च्या सुमारास बादशाही सैन्याचा अधिपति वालेनस्टाईन व प्रॉटेस्टंट पंथीय लोकांचा पुढारी गस्टव्हस हे दोन प्रख्यात सरदार एकमेकांशीं झुंझण्यास सज्ज झाले. या दोन प्रमुख सेनापतींनीं कांहीं किरकोळ जय मिळविल्यावर त्यांची लिपझीकनजीक लटझेन या गांवीं गांठ पडून, तेथें झालेल्या निकराच्या लढाईत उभयपक्षांची बरीच प्राणहानि झाल्यावर गस्टाव्हसच्या सैन्यास जय लटझेनची लढाई १६३२. मिळाला खरा, परंतु त्या लढाईत गस्टाव्हसला बळी पडावें लागलें. ( विभाग ४ था . ) लटझेनच्या लढाईत गस्टाव्हस मारला गेल्यामुळे स्वीडिश सैन्याची फारच चमत्कारिक स्थिति झाली. गस्टाव्हसची मुलगी ख्रिश्चाना ही अगदींच अल्पवयी असल्यानें राज्यकारभाराची सर्व सूत्रे आक्सेनस्टर्न या मुख्य प्रधानाच्या हाती गेलीं. या प्रधानाच्या मुत्सद्देगिरीने राज्यकारभाराची सर्व व्यवस्था नीट चालली होती, तरी स्वीडिश सैन्याचें आधिपत्य स्वीका- रण्यास गाव्हसप्रमाणें कोणी समर्थ सेनापति नसल्यामुळे १६३४ मध्ये नार्डेनजेन येथील लढाईत स्वीडिश फौजेचा बादशाही फौजेकडून मोड झाला. यावेळीं बादशाही फौजेचें आधिपत्य वालेनस्टाईनसारख्या कसलेल्या सेनापतीकडे असतें, तर बादशाही फौजेकडे वर मान करून पहाण्यास