या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / पाच
संपादकीय
'युगान्त' मधील लेखांत सर्वत्र लेखनाच्या दृष्टीने एकरूपता रहावी, यासाठी लेखिकेची सर्वसाधारण प्रवृत्ती लक्षात घेऊन पुढील धोरण अनुसरले आहे :
- 'हा (ही, हे)' या सर्वनामाच्या प्रथमेतर विभक्तींच्या रूपांत 'ह' हा घटक राखून येणारे अंग स्वीकारले आहे. जसे : ‘ह्याला, ह्याने, ह्यांना' इत्यादी. ('याला, याने, यांना' इत्यादी नाही.)
- प्रयोजक रूपांत 'इ' आगम केलेला नाही. जसे 'बसवला, कळवतो.' (-वि- नाही.)
- '-आयला, -आयचा' हे अंत असलेली कृदन्ते स्वीकारली आहेत. जसे : 'करायला, करायचा' ('करावयाला, करावयाचा' नाही.)
- अवतरणे शुद्ध केली आहेत : 'वासुदेवोऽस्मि' (-ऽहम् २०६.६) 'पुराणः' (प्रमाणम् २२६.१६); 'त्वयोपास्यानि' (ग्रहीतव्यानि २७०.६), 'यो मे' (यो मां २७६.१०)
- व्याकरण दृष्टीने जी स्वतंत्र ‘पद' आहेत, ती- जेथे जोडून लिहिण्याची रूढी आहे तेथेही- एकमेकांपासून अलग लिहिली आहेत.
पुणे / २०.४.१९७१ कृश्रीअ
टीप :- याखेरीज अन्य काही बदल अर्जुनवाडकरांनी केले होते.
या किरकोळ बदलांची यादी या आवृत्तीमध्ये समाविष्ट केलेली नाही.