पान:युगान्त (Yugant).pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / सात

निवेदन



 हे पुस्तक तयार होण्यास अनेकांची मदत झाली. त्या ऋणाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यासाठी हे निवदेन आहे. गेली पाच वर्षे मी हे लेख लिहीत आहे. पुष्कळ वेळा प्रसिद्ध न झालेले पण तयार असलेले संशोधित आवृत्तीचे महाभारताचे भाग मला ताबडतोब पाठवून देऊन प्रो. रा. ना दांडेकरांनी मला मदत केली. सर्व लेख एकत्र करून पुस्तक बांधावे अशी कल्पना आली, तेव्हा प्रो. नरहर कुरुंदकर ह्यांनी सर्व लेख चिकित्सेने वाचून अनेक सूचना केल्या. आमच्या कॉलेजचे मुख्य प्रो. सु. मं. कत्रे ह्यांनी किती वेळा मदत केली, त्याला गणतीच नाही. कोठच्याही संस्कृत शब्दाचा मी करते तो अर्थ बरोबर आहे का, अर्थ कळला नसल्यास तो अर्थ काय, हे समजण्यासाठी डिक्शनरी उघडायची तसदी न घेता मी सरळ प्रो. कत्र्यांकडे जात असे, व तेही हातांतले काम बाजूस ठेवून पहिल्याने माझी जिज्ञासा पुरी करीत. तोच उपयोग प्रो. मेहेंदळ्यांचाही झाला. प्रो. कालेलकरांनी मराठी व त्याचे इंग्रजी संस्करण बारकाईने वाचून कित्येक ठिकाणी चुका दाखवून दिल्या. प्रो. पुंडलीकांबरोबर झालेल्या अनेक संभाषणांमुळे विचार पक्के बांधावयास मदत झाली. माझे पी-