पान:युगान्त (Yugant).pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४२ / युगान्त यदुवंश संबंध वंश दिला नाही. मुख्य-मुख्य नावे दिली आहेत. वंश फार विस्तारलेला व पुराणात त्याबद्दल एकवाक्यता नाही असा आहे. महाभारतात कोठेही ह्या वंशाची संगतवार माहिती नाही. हरिवंशात फारच घोटाळ्याची व चुकीची माहिती आहे. वरील वंशावळ निरनिराळ्या पुराणांचा अभ्यास करून पार्गिटरने आपल्या 'जनरल सर्व्ह ऑफ एन्शंट इंडियन हिस्टॉरिकल ट्रॅडिशन', १९२२, ह्या पुस्तकात दिलेल्या वंशावळींवरून तयार केली आहे. जेथे बापमुलाचे नाते, उभी ओळ सलग काढली आहे. जेथे जास्त लांब वंशजाचे नाते, तेथे तुटक टिंबांनी दाखवली आहे. चेदी, विदर्भ, भोज, वृष्णी, अंधक, शैनेय हे सर्व पितृकुलाकडून नातेवाईक होते. त्यांची परस्परांत लग्नेही होत होती. चेदी व विदर्भ ह्यांनी स्वतंत्र राज्ये स्थापिले. कदाचित मथुरा कंसाच्या मुलांच्या ताब्यात असावी. ह्या वंशावळीवरून कृष्णाची पैतृक नावे (माधव, यादव, सात्वत, वार्ष्णेय, शौरी व वासुदेव) समजतील. तेथे