पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राणी : पण कुणीतरी बघतंय, लक्ष देतंय म्हणजे भारीच वाटतं गं. नाहीतर घरात सारखी कटकट. इशा : सोड गं, त्या काळजीपोटी बोलतात तसं. तुझे लाडपण करतात की नाही, तुझ्या बर्थ डेला बघ कितीजणी बोलावलेल्या. काकूनी केली की नाही पावभाजी त्यांना बरं नसतानाही. राणी : हो गं खरं तर ... इशा : आणि परवा एक्झामच्या वेळी तुला ताप आलेला तर तीन तास वर्गाबाहेर बसून | राहिलेल्या ना. राणी : हो! इशा : तू पण थोडं अभ्यासाकडे पण लक्ष दे. आईला मदत कर, चिडचिड करू नको. राणी : हो मॅडम! युवर ऑर्डर ! इशा : ए.... ऐकायचं गं.... । ।। १) राणीच्या मम्मीचं चुकतंय का? २) राणी का वैतागली असेल? ३) इशाच्या आईने तिला केस रंगवायला कशी काय परवानगी दिली असेल ? ४) अभ्यास, घराण्याची इज्जत या गोष्टींचा केस रंगवण्याशी नक्की काय संबंध असावा? 9) फॅशनेबल असणं वाईट आहे का?