Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पतन पावणाऱ्या पदार्थांचे नियम.

५५

 पहिल्या सेकंदांत १६ फुटींतून दगड पडला, त्या १६ नीं त्या वर्गास गुणिलें असतां उत्तर पूर्वप्रमाणेच येईल, ह्मणजे १६×१६ = २५६ फुटी होतील. -

 उभ्या कड्यापासून सुटलेला दगड, प्रथम हळू हळू पडूं लागतो, परंतु तो जसजसा खालीं जातो तसतसे त्याचें गमन वाढल्या वेगाने होते आणि प्रतिक्षणी त्या- चा आंगीं अधिक वेग आणि वेगाघात हीं येतात, शे. वटी त्याचा आंगीं इतकी शक्ति येथे कीं, जें कांहीं त्यास प्रतिबंध करूं पहातें, त्यास तो आपल्या बरो- बर घेऊन जातो.

 मध, गुळाची राब इत्यादि घट्ट पदार्थ उंच ठिका- णावरून ओतले असतां, पतन पावणान्या पदार्थांचा वेग वाढण्याचे कारण दाखवितां येईल; जर पडण्याचें ठिकाण फार उंच असलें, तर भांड्यांतून पडतांना जा धारेची जाडी सुमारे दोन इंच व्यासाची असत्ये, ती दुसन्ये भांड्यांत पडत्ये समयीं बारीक दोरीसारिखी होत्ये; परंतु जितका तिचा जाडेपणा कमी होतो ति- तका तिचा आंगीं वेग अधिक येतो, कां कीं जा पा त्रांत ती ओतायची असत्ये तें पात्र अति त्वरेनें भरते. कोणी एक पुरुषाने खुरची वरून उडी मारिली तर त्यास कांही दुःख होत नाहीं, जर त्याणें उंच खिडकीं- तून उडी टाकिली तर कदाचित् त्याचे हाड मोडेल, आणि जर त्यापेक्षां एका उंच घराचा टोकावरून उडी मारिली तर, जमीनीस पोंचल्याचे पूर्वी त्याचा आंगीं