Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
पतन पावणाऱ्या पदार्थाचे नियम.

विलेल्या वेगाने चालतो; जा वेळांत तो ब पासून क जवळ येतो तेव्हांचा वेग दाखविण्यास बह रेघ घे.. जर हे निरनिराळे समांतर बाजू चौकोन पुरे केले तर, अब काळांतील स्थळ, अ ग, समांतरबाजू चौकोन दाख वील; ब क काळांतील सर्व स्थळ ब म समांतर बाजू चौकोन दाखवील, आणि याप्रमाणे पुढेही. -

 विहिरी, खोल स्थळे इत्यादिकांची खोली काढण्याचा व्यवहारी कामास पतनाचे नियम लावले असतां, ते मोठे उपयोगी आहेत असें दाखवितां येईल. जर एकाद्या विहिरींत दगड सोडून देऊन त्यास तळीं पोंचण्यास किती वेळ लागतो हैं पुरतेपणीं समजलें तर, वर लि- हिलेल्या कारणावरून त्या विहिरीची खोली काढितां येईल. मनांत आण कीं दगड विहिरीचा तळीं चार सेकंदांत पोचला.

तर पहिल्या सेकंदांत तो १६ फुटी पडला असावा,

दुसऱ्या सेकंदांत त्याचे तिप्पट ह्मणजे ४८ फुटी,
तिसऱ्यांत पांचपट ह्मणजे ८० फुटी,
चवथ्यांत सातपट ह्मणजे ११२ फुटी,

यावरून विहिरीची सर्व खोली २५६ फुटी असावी.

 ही पुढील रीति स्मरणांत ठेवण्यास फार सुलभ आहे, आणि तिचा योगानें हैं वरचें उत्तर येईल; जसे काळाचे वर्ग वाढत जातात, तशीं पतन पावणाऱ्या पदार्थाची पतन स्थळे वाढत जातात. यावरून जा- पेक्षां दगडास विहिरीचा तळाशीं पोंचण्यास चार से- कंद लागतात, त्या सेकंदांचा वर्ग १६ आहे; आणि