Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रेरणैकीकरण आणि प्रेरणापृथक्करण. आकृति ११. ब क आकृति १२. फ २३ जर एक पदार्थ अ पासून ब कडे जात आहे, (आकृति ११) आणि त्याचा वेग एक मिनिटांत त्यास अव अंतरावर नेतो असा आहे, आणि जर त्यास दुस- री एक प्रेरणा अक दिशेत दिली जी त्यास एका मि निटांत अ पासून कपर्यंत नेये, तर या नव्ये प्रेरणेपा- सून त्यास किती अधिक वेग प्राप्त होईल हे समजण्या- साठीं समांतर चौकोन पुरा करून अड कर्ण काढावा, आणि अब रेघेहून अड कर्ण जितका अधिक लांब होईल, तितका अधिक वेग होईल. त्याचप्रमाणे जर अक प्रेरणेचाबदल अइ प्रेरणा दिली (आकृति १२) तर तिची दिशा अब चा दिशेचे उलटी हे स्पष्ट आहे ह्मणून, ती पदार्थाचा वेग अधिक न करितां उणा मात्र करील; पूर्वीप्रमाणे अफ कर्ण काढावा, आणि त्याहून अब वाजू जितकी लांब असेल तितका वेग या नव्ये प्रेरणेमुळे कमी होईल.- या मुख्य कारणावरूनही पुढील आधाररूप रीति स्थापिली जात्ये; "जर एका पदार्थावर दोन चलन देणाऱ्या प्रेरणा एकाकाळी घडल्या आणि त्यांतून एक एक त्या पदार्थास सांगितल्या काळांत समान चलनानें चौरसाचा अथवा समांतर चौकोनाचा बाजूवरून नेये,