Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उतरण.

१८३.

चीं यंत्रे असतात, त्यांचा योगानें टेकड्यांचा चढाव चांगला काढितां येतो.

 दुसऱ्या यंत्रांचा योगानें मोठीं वजने उचलण्यांत सहाय होण्यासाठी तयार केलेल्या उतरणी कामांत आणितात; ईजिप्त देशांतील पिरमिड आणि त्या सा- रिख्या दुसऱ्या पुरातन मोठ्या इमारतींचा कामांत, जे मोठाले दगड आणिले आहेत, ते मातीचा अथवा लां- कडाचा उतरणीकरून, त्यांवरून वाटोळ्या लाटा आ- णि उच्चालक यांचा सहायाने वर चढविलेले असावे. जी ढेंकडी फार उभी असत्ये तिचावर सहज चढवत नाहीं, याजकरितां तिचा भोवताली प्रदक्षिणारूप वाटोळा 'अथवा ना- गमोडी र स्ता करि- तात. बाजू वरील आ- कृति पा हा ;- डों- गरावरचा रस्त्याव- रून ओझें ओढणाऱ्या घोड्यास रस्त्याने समोर नेऊ नये, रस्त्या- चा एका बाजूवरून दुसऱ्या बाजूंस ने नेत वर चढावें, तेणेंकरून घोड्यावर जो ताण येतो तो पुष्कळ कमी होतो. सर्व प्रकारचे जिने उतरणी आहेत,