Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रेरणा - प्रतिबंध - स्वतंत्र चलन.

इत्यादि कारणांचे प्रतिबंधक व्यापारापासून मुक्त अशा अवस्थेत ठेवतां आला, तर त्याचे चलन अक्षय आ- णि सारखे होईल. जा कारणानें स्थिर पदार्थाचे आंगीं चलन उत्पन्न होतें, अथवा चलन पावलेल्या पदार्थाचें चलन फिरतें त्या कारणास प्रेरणा ह्मण- तात. जा रेषांत प्रेरणा पदार्थावर लागतात, त्या रेषांनी अथवा अंकांनी त्या प्रेरणा दाखविण्यास सुलभ पडते; प्रेरणेचे परिमाण रेषेचे लांबीने दाखवितां येतें. जा कारणावरून चलन पावलेल्या पदार्थाचें चलन कमी होतें, अथवा नाहींसें होतें, अथवा उलटें होतें, त्यास प्रतिबंध ह्मणतात.

 जा रीतीनें पदार्थावर प्रेरणा घडत्ये त्याप्रमाणें त्याचें चलन बदलते. जेव्हां आधाराधेयभावाने राहणारे पदार्थ एककालीं चलन पावतात, तेव्हां त्या चलनास साधारण चलन ह्मणतात ; जसें हंकारलेल्या गलबता- वरील मनुष्यांस गलबताचे चलन असतें. -

 स्थिर पदार्थाचा संबंधानें जें दुसऱ्या पदार्थाचें चलन त्यास स्वतंत्र चलन ह्मणतात ; जसे एके जाग्यापासून दुसरे जागी जातो; तारूं पाण्यांतून जातें ; हीं स्वतंत्र चलनाचीं उदाहरणे आहेत.

 चलनयुक्त पदार्थाचा संबंधानें दुसऱ्या पदार्थाचा चलनास संबंधी चलन ह्मणतात. जसें गाडीत बसून जा- णारा मनुष्य गाडीचे संबंधाने पाहिले असतां स्थिर आहे; परंतु गाडी त्यास एका स्थानापासून दुसये स्था- नये ह्मणून त्याचें चलन स्वतंत्र होय; जरी