Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चलनास प्रतिबंध

केला तर त्यास टांगलेले स्थानाशी में घर्षण होतें त्याचा मात्र प्रतिबंध होतो, दुसरा कशाचाही प्रतिबंध नाहीं, ह्मणून तो फार वेळपर्यंत झोंके खाईल. सारखे जाडीचे एक चाक घे आणि त्याचे मध्यभागी बारीक आंस बशीव, तो अशा रीतीनें कीं त्याचे सर्व भाग मध्याशी समतोल होतील. अशा आंसावर तें चाक फिरविलें असतां त्याची गति गुरुत्वाकर्षणामुळे वा- ढणार नाहीं, अथवा कमीही होणार नाहीं. अ- शा चाकाचा गतीस प्रतिबंधक कारणें, एक त्याचे आसाचें घर्षण, आणि दुसरें हवेचा प्रतिबंध, हीं दोन मात्र आहेत. जर कदाचित् तो आंस घर्षणच- क्रांवर ठेवून घर्षण नाहींसें केलें, तर तें चा जितका काळपर्यंत पहिले नुसते आंसावर फिरेल, त्या- हून अधिक वेळपर्यंत अशा कृतीनें फिरेल. आणि जर हैं सर्व वाताकर्षक यंत्राचे निर्वात पात्रांत ठेविलें, तर त्यास हवेचाही प्रतिबंध नाहींसा होईल; आणि तें चाक समानगतीनें फार वेळपर्यंत फिरेल

 या उदाहरणावरून असें नजरेस येतें कीं, एकाद्या पदार्थास प्रेरणेचे योगानें चलन देऊन त्या चलनास घर्षण, हवा, यांपासून अथवा दुसरे कित्येक कारणां- पासून होणारे जे प्रतिबंध ते जसजसे नाहींसे करावे, तसतशी त्या चलनाची स्थिति आणि तिचा सारखे- पणा हीं वाढत जातात. जे दाखले आपले नजरेस येतात त्यांजविषयीं अशीच गोष्ट असत्ये, ह्मणून असा सिद्धांत करितां येतो, की जर एकादा पदार्थ, घर्षण,