Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२०
वाकडा उच्चचालक.

वर तें छिन्न फिरतें. ग बिंदूंतून म ग ह क्षितिमर्याद- रूप रेघ काढिली आहे असें मनांत आण, आणि जें व वजन तोलून धरावयाचें तें फ स्थळीं लाव, आणि जी प शक्ति त्या वजनास तोलून धरणार तीस क स्थ- ळीं टांग. असे केल्यावर जर शक्तींतील तोळे आणि ग मध्यापासून त्यांचे अंतर जितके इंच असेल त्यांचा गुणाकार, आणि वजनांतील तोळे, आणि त्याच बिंदू- पासून त्यांचे अंतर जितके इंच असेल त्यांचा गुणाकार हे बरोबर असतील तर, शक्ति वजनास तोलून धरील. उदाहरण, जर प शक्ति ३ तोळ्यांची असून ग आंसा- पासून ६ इंच लांब असेल, तर ती शक्ति त्याच बिंदू- पासून २ इंचांवर ९ तोळ्यांचे वजन तोलून धरील. जसें (३x६=९×२).

इ आकृति ८०. अ ब

 पुनः फ बिंदूपासून एक ब वजन दोरीने टांग, (आकृति ८०) तर हैं वजन त्या पदार्थास अ ब स दिशेत फिरवील. नंतर दुसरी एक दोरी क बिंदूशीं बांध, आणि तीस इ चाकावरून नेऊन तिचे टोकास एक प वजन टांग, असें कीं तें त्या पदार्थास आंसावर स ब अदि- शेत फिरवील आणि व वजनाचा विरुद्ध दिशेत फिर- याचा जो झोंक आहे त्यास तोलून धरील. जर व आणि प वजने किती आहेत हैं ठरविलें, आणि मध्या- पासून दो-यांची गफ आणि गक लंबांतरे बरोबर मो-