Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाकडा उच्चालक.

११९

योगानें जो व प्रतिबंधक स्थळी होतो, तो असा आहे कीं, प आणि फ टेंकूपासून त्याचे अंतर यांचा गुणा- कार, आणि व आणि,ब फ यांचा गुणाकार हे दोन्ही बरोबर होतात; आणि जो प्रतिबंध क स्थळीं घडतो, त्यास शक्ति असें मानितों, तर तुलना होण्यासाठीं ती शक्ति आणि तिचे क फ अंतर यांचा गुणाकार, डफ आणि ड वजन यांचा गुणाकाराबरोबर असावा.

 गाडीचे चाक काढून घेण्याकरितां गाडी उचल- ण्यास जे उच्चालक घेतात ते या जातीचे असतात. -

_________
वांकडा उच्चालक.

 पूर्वी निरनिराळे जातीचे सरळ उच्चालकांविषयीं विचार झाला, आतां या यंत्राचा विस्तीर्ण रूपानें वि चार करितों. तेंयंत्र एक भरीव पदार्थ आहे, आणि त्यांत एक बसिवलेला आंस आहे, त्याचे भोंवतीं तें फि- रतें असें मानितों. ही गोष्ट सांगि- तली असतां वांकड़ा उच्चालक सहज समजेल.

 अब क, ( आकृति ७९) एक भरीव वस्तूचें छिन आहे, आणि कागदाचे पातळीशीं लंबरूप असा एक बसविलेला ग आंस आहे, त्या-
आकृति ७९. अ क ग फ ह म प व