पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्वासप्रणाली जाणिवपूर्वक लक्ष देऊन करायची आहे. त्या त्या स्नायूंना अधिक प्रमाणात प्राणतत्वाचा पुरवठा करायचा आहे. सूक्ष्म व्यायाम करतांना स्नायूंना आतून ताण-दाब देण्याचा प्रयत्न करतांना हा अनुभव येतो. एखादी कृती श्वास सोडून करतांना काही स्नायू ताणले जातात हे लक्षात येते. तिच कृती श्वास घेवून केली तर त्याच ठिकाणचे पण वेगळेच स्नायू ताणले जातात, कार्यप्रवृत्त होतात हेही प्रकर्षाने लक्षात येते. बारा शरीर स्थिती असलेला एक सूर्यनमस्कार चार श्वासात घालता येतो. श्वासाच्या तालावर शरीर स्थिती बदलायची आहे. त्याचा सराव हळूहळू करायचा आहे. श्वास घेऊन ऊर्जाचक्र पकडायचे म्हणजे त्या उर्जाचक्राला प्राणतत्त्वाचा, वैश्विकशक्तीचा, प्राणवायूचा विपुल प्रमाणात पुरवठा करायचा. तो भाग ठोस- -जड- पक्का आकाराने मोठा करायचा. नंतर पुढील कृती करायची. म्हणजे अगोदर शक्तीचा पुरवठा, मग कार्याला चालना हे सूत्र संभाळायचे. आपण जेंव्हा श्वास सोडून ऊर्जाचक्र पकडतो तेंव्हा तेथील प्राणशक्ती काढूत घेतो. ते रिकामे करतो. त्याची लवचिकता वाढवितो. मग पुढील कृती करण्यास सुरूवात करतो. प्रत्येक कृती करतांना मन ऊर्जाचक्रावर केंद्रित केलेले असते. ज्या ठिकाणी मन एकाग्र केले जाते तेथे शक्ती म्हणजे ऊर्जा किंवा कार्यक्षमता तयार होते. हा सूर्यनमस्काराचा एक महत्वाचा नियम. या प्रकारच्या क्रियेतून श्वसनप्रक्रीया सशक्त होते. प्राणतत्त्वाचा स्वीकार अधिक प्रमाणात करण्याची शरीराला सवय लागते. आपल्या शरीराची ताकद व मनाचे सामर्थ्य मेरुदंडामध्ये आहे. ही मरुताची म्हणजेच वायुची ताकद आहे. मेरुदंडाला सर्पाकृती आकार आहे. हा नैसर्गिक आकार म्हणजे आपले शरीराचे आरोग्य व मनाचे स्वास्थ्य आहे. यात थोडाजरी बदल झाला तरी ते उध्वस्त होते. कमरेत उसण भरली तर शरीर स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदना आपण अनुभवल्या आहेत. मणक्यांच्या माळेतील एखाद्या मणक्याच्या जागेत किंचीत जरी बदल झाल तरी त्याच्या अखत्यारित असलेल्या अवयवांची कार्यक्षमता कमी होते. रक्ताभिसरणावर परिणाम होतो. वेगवगळे रोग, व्याधी, विकार सुरू होतात. या विकारावर उपचार सूचवितांना वैद्यकशास्त्र मेरुदंड व त्यातील मणक्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षणे परामर्श घेतात. मेरूदंडावरील मर्मस्थान म्हणजेच ऊर्जाचक्र. प्रत्येक ऊर्जाचक्र शरीरातील महत्वाचे शक्तीस्थान आहे. मेदवृद्धीतून मुक्ती ६३