पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शक्तीशाली व वैशिष्ट्यापूर्ण आहे. या अन्नभट्टीचे इंधन आहे सौर ऊर्जा म्हणजेच सूर्यतेज. या भट्टीचे कार्य शरीरातील सर्व संस्थांच्या सहकार्याने सुरू असते. शरीरात असंख्य संस्था व संस्थाने आहेत. त्यातील तीन संस्था प्रमुख आहेत- पचन संस्था, श्वसन संस्था, मज्जा संस्था. यातील प्रत्येक घटक इतर सर्व घटक राज्यांचे प्रशासन परिपूर्ण ठेवण्यासाठी सतत प्रयत्ननशील असतो. सर्व संस्थांचे कार्य दोन प्रकारचे असतात. एक त्या त्या विभागाचे नेमून दिलेले कार्य. उदाहरणार्थ पोटाचे कार्य आहे अन्नाचा स्वीकार करणे, ते पचविणे. त्यातून अन्नरस, रक्त, मांस, हाडे, रेत, तेज, (धवल) किर्ती इत्यादीने शरीर परिपूर्ण करणे. दुसरे कार्य आहे ते वृद्धीचे, शरीर वाढीचे. शरीर जसे वाढेल तसे त्याचे आकारमान योग्य प्रमाणात वाढविणे व त्या अनुशंगाने पचन संस्था अधिक बलशाली करणे. अग्नीची ज्योत प्रखर तेवत ठेवण्यासाठी जशी अग्नी आणि प्राणवायू यांची गरज आहे तसेच अन्न आणि प्राण यांचे संयुक्त प्रयत्नातून पचन संस्थेचा विकास साध्य करता येतो. कोणते अन्नघक, किती प्रमाणात, केंव्हा, कोणत्या पद्धतीने सेवन करायचे हे आहार शास्त्र सांगते. शरीरामध्ये अधिकाधिक प्रमाणात प्राणतत्वाचा स्वीकार करण्याची सवय सूर्यनमस्कार साधनेतून लागते. यासाठी समान वायूच्या कार्यकक्षेत येणा-या सर्व मांस पेशी प्राणऊर्जेने प्रभावित करण्याची जबाबदारी सूर्यनमस्कारातून साध्य करण्याचा सातत्याने प्रयत्न करायचा आहे. या विभागातील प्रत्येक पेशींच्या आनंदी नृत्याचा चैतन्यपूर्ण अविष्कार अनुभवायचा आहे. मेदवृद्धीतून मुक्ती ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ ५१