पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्राणस्थाने प्राणवायूच्या सहाय्याने प्रभावित करायची आहेत. त्यांची कार्यशक्ती प्रबल करायची आहे. पोटात घेतलेले अन्न शरीराला ऊर्जाशक्ती देते. त्यामुळे प्रत्येक अवयवांमध्ये असलेल्या स्नायूंची शक्ती वाढते. त्याच प्रमाणे छातीमध्ये घेतलेले प्राणतत्त्व त्या त्या भागातील सर्व स्नायू-पेशींना प्राणाची ऊर्जा देतो. अन्न शक्ती आहे, वायू प्राण आहे. एक स्थूल शरीर संभाळतो दुसरा सूक्ष्म शरीराला आधार देतो. एक शक्ती देतो दुसरा प्राणचैतन्य प्रदान करतो. हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्यास प्राणतत्त्वाचा पुरवठा सर्वच विभागांना सारख्या प्रमाणात होत नाही. रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. शरीराच्या काही भागात शक्तीऊर्जा व प्राणऊर्जा यांचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. त्या विभागाचे कार्य क्षीण होते. आजारपण रोग-व्याधी-व्यसन यांची सुरूवात होते. ते टाळण्यासाठी त्या त्या प्राणस्थानाकडे लक्ष देऊन सूर्यनमस्काराचा सराव करायचा आहे. पांचप्राण प्राण अपान व्यान ऊदान समान शरीरातील त्यांचे स्थान श्वासपटल ते स्वरयंत्र नाभी ते पायाचे अंगठे संपूर्ण शरीर स्वरयंत्र ते शेंडी प्राणाचे कार्य त्या-त्या भागातील सर्व अवयवांना ऊर्जा - कार्यशक्ती - पुरविणे वरीलप्रमाणे वरीलप्रमाणे वरीलप्रमाणे वरीलप्रमाणे श्वासपटल ते नाभी आपण नाकाने श्वास घेतो. तो जमा होतो छातीत असलेल्या फुप्फुसामध्ये. तोच श्वास आपला प्राण आहे. हा श्वास संपूर्ण शरीरात पसरतो. अगदी पायाच्या अंगठ्याच्या नखाच्या टोकापासून ते डोक्यावरील केसांपर्यंत. संपूर्ण शरीरात तसूभरही जागा नाही जेथे हे प्राणतत्त्व नाही. शरीराचे पाच भाग करून ज्या भागात हे प्राणतत्त्व कार्यरत असते त्याप्रमाणे प्राणचैतन्याला नावे दिलेली आहेत. समान वायूचे स्थान नाभीचे वर - श्वासपटलाचे खाली आहे. हे अग्नीचे स्थान आहे. त्याला जठराग्नी म्हणून ओळखले जाते. ही अन्नभट्टी आहे. ती अणूभट्टी प्रमाणेच मेदवृद्धीतून मुक्ती ५०