पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समदोषः समग्निश्च समधातुमलक्रियः । प्रसन्नात्मेंद्रियमनाः स्वस्थइत्याभिधीयते || सुश्रुत सू. १५/४१ संपूर्ण स्वास्थ्याची व्याख्याच सुश्रुत सुक्तामध्ये आलेली आहे. दोष, धातू, मल, अग्नी यांच्या क्रिया सम असणे तसेच आत्मा, मन, इंद्रिय प्रसन्न असणे हे स्वास्थ्याचे, आरोग्याचे लक्षण आहे. भूक लागणे, राग येणे, उत्साह- जिद्द असणे हे सर्वच आवश्यक गुण आहेत. पण त्याचा अतिरेक झाल्यास तो अवगुण होतो. या विकारावर उपचार करणे गरजेचे ठरते. शरीरात पंचमहाभूते आहेत म्हणून माणूस गुणी-अवगुणी, रोगी-निरोगी असतो. शरीर पंचमहाभूतांमध्ये विलीन झाले की हे गुण-दोष लुप्त होतात. सूर्यनमस्कार साधनेच्या माध्यमातून शरीरात असणाऱ्या पंचमहाभूतांचा उपयोग करून सर्व गुण आणि दोष सम प्रमाणात ठेवायचे आहेत. संपूर्ण आरोग्यासाठी दररोज किमान पंधरा मिनिटे प्रयत्न करायचा आहे. ॥जय जय रघुवीर समर्थ ।। मेदवृद्धीतून मुक्ती ३४