पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनेन सूर्यनमस्काराख्येन कर्मणा भगवान श्रीसविता सूर्यनारायणः प्रीयताम् न मम ।। ।।हरिः ॐ तत्सद् ब्रह्मार्पणमस्तु ।। अकालमृत्यु हरणं सर्व व्याधि विनाशनम् सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् ।। समर्पण- जगातील सर्व समर्थभक्त व सूर्यनमस्कार साधक यांना आदरपूर्वक अर्पण. आज तुम्ही सर्वांनी सूर्यनमस्काराची दीक्षा घेतलेली आहे. सूर्यनमस्काराचा गंडा बांधला आहे. सूर्यनमस्कार साधक झालेला आहात. दीक्षा देणारा गुरू आत्माराम. घेणारा शिष्य जीवात्मा. मी एक गुरूबंधू. फक्त एक माध्यम. सद्गुरूंच्या संमतीने साधनेत आलेले अनुभव आपणा समोर मांडणारा. अंतःकरणातील आत्मारामाकडून साधना शिकण्यासाठी दिशादर्शन करणारा. सूर्यनमस्कार साधनेची दीक्षा आत्मारामाने आपणाला दिलेली आहे. साधनेतील प्रचितीही तोच देणार आहे. तोच तुम्हाला समर्थ करणार आहे. त्या रामाचे दास व्हा. सौख्यकारी, शोकहर्ता बनण्याचा प्रयत्न करा. तुमच्या रुपात मला दिसलेल्या समर्थ रामदास स्वरूपाला विनम्र भावे वंदन करून आजचे सूर्यअर्ध्य पूर्ण करतो. सहनाववतु । सहनौभुनक्तु । सहवीर्यं करवावहै । तेजस्विनावधीतमस्तु। मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।। कठोपनिषद ॥ जय जय रघुवीर समर्थ ।। || महारुद्र हनुमान की जय ।। || श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराज की जय ।। मेदवृद्धीतून मुक्ती १७१