पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चहा / गरम पाणी घेणे गरजेचे असल्यास अंघोळीच्या एक तास अगोदर घ्या. सूर्यनमस्कार घालण्यासाठी चादर किंवा शाल बरोबर आणा. (त्याची घडी घालून सूर्यनमस्कार आसन तयार करता येते.) एक हाथरुमाल बरोबर ठेवा. डास प्रतिबंधक ओडोमस किंवा खोबरेल तेलात भिमसेनी कापूर एकत्र करून जवळ ठेवा. तेरा वर्षाचे आतील मुले/मुली असल्यास आई किंवा वडील यांनी त्यांचे बरोबर शिबिरामध्ये भाग घेणे अपेक्षित आहे. प्राणायामाचा सराव करतांना आपल्या पाल्याकडे त्यांना विशेष लक्ष देता येईल. सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग पूर्ण केल्यानंतर दररोज नित्यनेमाने किमान बारा +१ सूर्यनमस्कार प्रत्येक साधकाने घालावे अशी अपेक्षा आहे. आपल्याला आलेला चांगला-वाईट अनुभव संस्थेस कळवावा, मार्गदर्शन घ्यावे, साधनेमध्ये सातत्य ठेवावे, साधनेचा अहवाल सादर करावा आणि वार्षिक सभासद वर्गणी किमान रुपये ११ =०० भरून संस्थेचे सभासद व्हावे ही आपल्या अंतःकरणातील आत्मारामाला विनंती. आवाहन

  • पृष्ठदान योजनेत सहभागी व्हा ( एका पृष्ठासाठी रुपये एक हजार मात्र )

सहभागी साधकांची यादी पुढील प्रकाशनात प्रसिद्ध केली जाईल व ते प्रकाशन आपल्याला भेट म्हणून मिळेल.

  • आपले कौशल्य व श्रमाचे दान करावे.
  • या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इतरांना मार्गदर्शन करावे.
  • छपाईसाठी देणगी द्यावी / मिळवून द्यावी.
  • सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग आयोजित करावेत.

आपल्या संपर्कातील सर्वांना सूर्यनमस्कार साधनेसाठी शुभेच्छा. मित्राय नमः रवये नमः सूर्याय नमः भानवे नमः पूष्णे नमः हिरण्यगर्भाय नमः खगाय नमः आदित्याय नमः - मेदवृद्धीतून मुक्ती मरिचये नमः अर्काय नमः : भास्कराय नमः सवित्रे नमः श्री सवितृ सूर्यनारायणाय नमो नमः १५८