Jump to content

पान:मेणबत्त्या १९०६.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कारखान्यांत उत्तम प्रकारच्या मेणबत्त्या तयार झाल्या. चिन्हरल साहेबांच्या सांगण्यावरून पारीस येथील कलोत्तेकजक मंडळीने कांहीं शर्तीवर दोन टन मेणबत्त्या तयार करणारास ४००० फ्रांकचें बक्षीस काढलें. त्या शर्ती खालीं लिहिल्याप्रमाणें होत्याः --
 १. मेणबत्त्यांची किंमत दर पौंडास ९ पेन्सांपेक्षा जास्त नसाची.
 २. मेणबत्तीचा प्रकाश तिच्यांतील स्टिअरीनच्या वजनाइतका मि ळावा; व तो प्रकाश मेणाच्या मेणबत्तीच्या प्रकाशापेक्षा कमी नसावा.
 ३. मेणबत्ती जळतांना वाईट वास, धूर किंवा ओघळ येऊं नयेत, व ती कठिण आणि सुकी असावी.
 ४. मेणबत्ती पातळ होण्याचे ऊष्णमान १२२° फा. अंशांपेक्षां कमी नसावें. इ० इ०
 मेसर्स मोटार्ट व मिली यांनी वरच्या शर्तीवर ज्या मेणबत्त्या तयार केल्या त्यांत पहिलीशिवाय सर्व अटी पूर्ण झाल्या होत्या. त्या मेणबत्यांची किंमत शर्तीमधील किंमतीपेक्षां दुप्पट पडूं लागली. ह्मणून त्याप्रमाणानें ते बक्षीस त्यांस मिळालें.
या कामीं मिली साहेबांनी चिव्हरल साहेबांच्या ज्या शोधांचा उपयोग केला त्यांची हकीगत ह्या ठिकाणीं लिहिणें अप्रशस्त होणार नाहीं. ती हकीगतः -  ‘ तेलें दोन प्रकारची असतात. १ स्थिर तेलें. २ अस्थीर तेलें. अस्थिर तेलांचे घटक, स्थिर तेलांच्या घटकाहून भिन्न असतात. झणून अस्थिर तेलें जाळण्याच्या उपयोगास अयोग्य होत.
 प्रत्येक स्वाभाविक वस्तूंत कांहीं तरी निराळें आसीड असतेच. त्याचप्रमाणे तिच्यांत एक विशेष प्रकारचें अस्थिर तेलही असतें. प्रत्येक वस्तूस कांहीं तरी गंध येत असतोच; व तो गंध येण्याचें कारण त्या वस्तूंत असणारें अस्थिर तेल होय.