Jump to content

पान:मेणबत्त्या १९०६.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांचे घटक संयुक्त असून मिश्र मूळ पदार्थांचे आहेत.सर्व स्निग्ध पदार्थ, कठिण व नरम अशा द्रव्यांनीं स्वभावतःच बनलेले आहेत. त्या कठिण नरम द्रव्यापैकीं दरेकांत स्निग्ध आसीड व ग्लिसराईन मिश्र आहे. "
 हा शोध स्टिअरीक आसीड काढण्याच्या धंद्याचा मूळ पाया झटला तरी चालेल.
 निसर्गानें लावून दिलेल्या गुणांप्रमाणें, दैदीप्यमान जळणाऱ्या स्निग्ध आसिडापासून, न जळणारें ग्लिसराईन निराळें केल्याशिवाय त्या दोन्हीं पदार्थोचा मूळ उद्देश व उपयोग यांची पूर्तता होत नाही.
 ग्लिसराईन शित्रायचें शुद्ध व घट्ट स्निग्ध आसिड विपुल व स्वस्त कोणत्या रीतीनें काढतां येईल या गोष्टीचा अद्यापही पुष्कळ उद्योगी लोक शोध करीत आहेत. तेव्हांपासून चिव्हरल एकेका स्निग्ध पदार्थाचें पृथःकरण करीत चालले. सन १८२३ साली त्यांनीं 'प्राणिज स्निग्ध पदार्थाचे रासायनिक शोध' या नांवाचें पुस्तक प्रसिद्ध केलें. हा वेळ पावेतों त्यांनी फक्त शास्त्रीय शोधाचेंच काम केले. त्या शोधापासून द्रव्यप्राप्ति त्यांस झाली नाहीं. पुढे ह्मणजे सन १८२५ साली पेटंट घेऊन मी० लुझाक साहेबांच्या भागीदारीनें स्टिअरीक आसीड काढण्याचा कारखाना त्यांनीं घातला. परंतु वस्तूचें रासायनीक ज्ञान चांगले असले ह्मणजे त्या ज्ञानाने ती वस्तू तयार करण्याचा धंदा हमेश फायदेशीरच होतो असें नाहीं. रासायनिक ज्ञान व त्यायोगानें त्या व्यापारांत होणारा फायदा ह्या दोन गोष्टी अगदीं निराळ्या आहेत.
 त्या धंद्यांत चिव्हरल साहेबांस फायदा झाला नाही. परंतु त्या महा- रसायनवेत्त्याने केलेल्या रोपणीचा फायदा एम. डी. मिली यांस मिळा- बयाचा होता. सन १८३२ सालीं मिली साहेबांनीं फ्रान्सदेशांत बरीची जवळ स्टिअरीक आसिडाच्या मेणबत्या करण्याचे काम सुरू केले. त्या