लंडनमध्यें लामबेथ मार्श येथें मेसर्स फील्ड आणि को यांचा मुख्य
व फार जुना मेणबत्या करण्याचा कारखाना आहे. ही संस्था केव्हां
अस्तित्वांत आली हैं जरी निश्चयात्मक ठाऊक नाहीं, तरी पण गेल्या
सहा पिढ्यांपासून हल्लींचा मेणबत्यांचा कारखाना सुरू आहे. या कार-
खान्यांत अजूनही मेणाच्या मेणबत्या तयार करतात. नवीन शोधाप्रमाणे
इतर द्रव्येही मेणबत्या करण्याकडे तेथें वापरतात. परंतु मूळचा मेणाच्या
मेणबत्या करण्याचा जो धंदा तो त्या संस्थेनें अद्याप सोडला नाहीं,
सन १८८५ पर्यंत इंग्लंडांतही नवीन वस्तूंचा कंटाळा करणारे लोक
होते असें दिसतें. त्या लोकांस ग्यास, विद्युत्, लोखंडी यंत्रें, रेलवे
वगैरे नव्या पदार्थांचा तिटकारा असल्यामुळे नवीन निघालेल्या स्टिअ-
रीक आसिडाच्या मेणबत्त्या न घेतां जुन्या चालीच्या मेणाच्या मेणबत्त्या
वरील संस्थेपासून घेत असत. इकडे हिंदु लोकांच्या पुराणप्रियतेस
नांवें ठेवणारांनी लक्ष द्यावें. या संस्थेचीं जुनीं हिशेबी पुस्तकें आहेत
त्यांत सन १७०० व्या वर्षाचा हिशेब लिहिलेला सांपडतो. इतकी
जुनी ती संस्था आहे. हल्लीं त्या कारखान्यांत स्परम्यासिटी, स्टिअरीन,
प्याराफीन, ओझोकिरीट आणि मधमाशांचें व वनस्पतिज मेण इतक्या
प्रकारच्या मेणबत्त्या निरनिराळ्या रीतींनी बनविण्याचे काम चालत
असतें. यावरून ज्या कामासाठी मूळ संस्था स्थापन झाली, तें मूळ
काम तर सुरू आहेच, मात्र त्या कामांत नवीन शोधाप्रमाणें फेरफार
करून नवीन साधनांनीं तोच माल उंची प्रतीचा बनविण्यांत धंद्याचा
प्रामाणिकपणा व त्यांत सतत परिश्रम यांणीं कारखाना कसा उर्जित
अवस्थेस पोंचतो याचे चांगले उदाहरण त्या संस्थेनें लोकांचे निदर्श-
नास आणून दिलें. सन १८३० मध्ये इंग्लंडांत मि० चार्लस व्याट
यांणीं चरबी शुद्ध करून मग ती दाबून मेणबत्त्यांचें कठिण द्रव्य काढ-
ण्याच्या रीतीचें पेटंट घेतले. त्या रीतीनें फक्त चरबी शुद्ध करून
पान:मेणबत्त्या १९०६.pdf/२६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२