पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२०

नंतर हीं पातळ आसिडें त्या साचांत सोडावीं हे ड साचे एका खोलींत दोन तीन दिवस ठेविले ह्मणजे तीं बरींचशीं घट्ट होतात. तोपर्यंत त्या खोलीचें उष्णमान ६८° फा. अंश ठेवावें. ड साचांत तीं आसिडें बरीचशी घट्ट होईपर्यंत ठेवावी. नंतर त्यांचे गरमसे तुकडे काढून घेऊन 'क्यानवासच्या किंवा लोंकरीच्या पिशव्यांत किंवा क्यानवासच्या चौकोनी तुकड्यांत ठेवावे. ह्या भरलेल्या पिशव्या हायड़ा लिक प्रेसमध्ये हळूच ठेवाव्या. नंतर ह्या पिशव्यांवर दाब देण्याचे काम सुरू करावें. प्रथम हळूहळू दाब देऊन त्यांतील पातळ जें ओलिईक आसीड तें बाहेर का- ढावें. तें निघालेले ओलिईक आसीड धरून दुसरीकडे ठेवावें. याप्रमाणें दाब वाढवीत वाढवीत पुष्कळ वाढवावा. पुष्कळ दाब देऊनही

त्या पिशव्यांतील द्रव्यांतून पातळ पदार्थ आतां बिलकुल बाहेर निघत

नाहीं अशी स्थिति झाल्यावर दाब बंद करावा. यासच थंडा दाब ( Cold pressing ) करण्याची क्रिया म्हणतात. या वेळेस त्यांतील पातळ जें ओलिईक आसीड त्याचा बहुतेक भाग बाहेर निघालेला असतो. सबब पहिल्या वड्यापेक्षा जास्त कठिण पण बारीक बारीक वड्या त्या पिशव्यांत रहातात. याच कठिण वड्यांस अशुद्ध स्टिअरीक आसीड म्हणतात.

५ वी क्रिया -- आतां चवथ्या क्रियेनंतर स्निग्ध पदार्थापासून मेण

बत्त्यांचें कठिण पण अशुद्ध द्रव्य (अशुद्ध स्टिअरीक आसीड ) तयार झाले. पण यांतही अद्याप पातळ जें ओलिईक आसीड त्याचा थोडासा शेष भाग असतोच. तो शेष भाग त्यांतून बाहेर काढण्यास्तव त्या अशुद्ध कठिण द्रव्यावर गरम दाब ( ५ वी क्रिया ) करावा लागतो. ह्मणून चवथ्या क्रियेनंतर इ प्रेसवरच्या पिशव्यांतील त्या वड्या काढून घेऊन ज हौदांत टाकाव्या. तेथें तें स्टिअरीक आसीड गरमीनें पातळ