पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११९ -

२ री क्रिया - नंतर व हौदाच्या खालच्या नळीवाटें त्या साबू-

खालीं जमलेले पाणी व ग्लिसराईन हळूच काढून दुसऱ्या पात्रांत ठेवावें.

३ री क्रिया - नंतर ब हौदांतील कठिण साबू खोदून काढून क

हौदांत टाकावा. याचे फार मोठाले गोळे नसावे म्हणून साधारण कुठून टाकावा. नंतर २१ शेर तीव्र सल्फ्युरीक आसीड ८४ शेर गोड्या पाण्यांत मिळवून हे मिश्रण थंड होऊं द्यावें. थंड झाल्यावर त्या क हौदांतील चुन्याच्या साबूंत हें सलफ्युरीक आसिडाचें मिश्रण मिळ- वावें. नंतर वाफेची किंवा विस्तवाची उष्णता देऊन हें सर्व मिश्रण तीन तास वारंवार ढवळून शिजवावें. म्हणजे त्या साबूंतील चुना निराळा पडून रसायन रीतीनें चुन्याचा सल्फेट बनून त्या हौदांत तळी जमतो; व मिश्र स्निग्ध आसिडें पातळ स्थितींत त्या मिश्रणाच्या .वर जमतात. असे झाले म्हणजे उष्णता बंद करून तें सर्व स्थीर ठेवावें. नंतर वर जमलेलीं घट्टशीं स्निग्ध आसिडें काढून घेऊन दुसऱ्या एका तशाच हौदांत टाकून त्यांत १९० शेर पाणी मिळवून गरम करावीं. हें मिश्रण पाव तास खूप जोरानें ढवळावे म्हणजे सलफ्युरीक आसिडाचा शेष भाग पाण्यांत मिळून जाऊन तीं मिश्र स्निग्ध असिडें साफ धुतली जातात. नंतर तें मिश्रण स्थिर ठेवावें ह्मणजे खाली पाणी व वर स्निग्ध आसिडें जमतात. .

४ थी क्रिया - स्निग्ध पदार्थातील ग्लिसराईन निराळें काढून

स्निग्ध आसिडें तर आपण काढलीं. पण या स्निग्ध आसिडांत पातळ व घट्ट अशा दोनही जातींचीं स्निग्ध आसिडें मिश्र आहेत. त्यांपैक आपणास घट्ट स्निग्ध आसिड निराळें काढणें आहे. ह्मणून धुतल्यानंतर त्या पाण्यावर जमलेलीं तीं स्निग्ध आसिडें काढून घेऊन एका लोखंडी कढईत टाकावी. ती पातळ नसल्यास तेथें गरमीनें पातळ करावीं.