Jump to content

पान:मेणबत्त्या १९०६.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६

प्याराफीन मोठ्या हौदांत पडेल अशी त्याची मांडणी करावी. दोन्ही हौदांचे पृष्ठभाग सारख्या पातळींत ह्मणजे सारख्या उंचीवर रहातील अशी योजना करावी. ह्मणजे लहान हौदांतील प्याराफीन मोठ्या हौदांतील पाण्यावर पडतें व लागलीच चोहोंकडे पसरतें. जितक्या जाडीचा थर पाहिजे असेल तितकी जाडी त्या थरास आली ह्मणजे लहान हौदांत प्याराफीन सोडण्याचें बंद करावें. नंतर ते मोठ्या हौदांतील प्याराफीन पाण्याच्या थंडीनें लवकर घट्ट होतें. नंतर त्याच्या वड्या किंवा तुकडे पाहिजे त्या आकारचे कापून काढून ठेवावे.
 याप्रमाणे कोणत्याही रीतीनें प्याराफीन मेणाचे तुकडे घट्ट होऊन तयार झाले आहेत. आतां त्यांस गरमी लावून त्यांतील कमी उष्ण- मानावर पातळ होणारे पदार्थ त्यांतून काढणें आहेत. ती दुसरी क्रिया होय.
 २ री क्रिया- - या क्रियेस इंग्रेजीत sweating process ह्मणतात. पहिल्या क्रियेंत प्याराफीन पातळ करून त्यांतील पाणी व मळ काढून टाकल्यावर त्याच्या एकसारख्या आकाराच्या वड्या पाडून ठेवल्या आ- हेत. आतां दुसन्या क्रियेनें त्या वड्यांतील कमी उष्णमानावर पातळ होणारे पदार्थ गरमीनें काढून टाकून ते स्वच्छ करणे एवढेच काम कसें करावें, त्याची माहिती दिली आहे. हे काम सोईवार होण्यास खालीं लिहिलेल्या साधनांची जरूर असते.
 १ वड्या ठेवण्याचें पात्र, २ त्या पात्रांत वड्यांस उष्णता देण्याचें साधन, ३ त्या उष्णतेनें त्या प्याराफीनमधून निघणारी पातळ द्रव्यें त्या पात्रांतून निरळ्या ठिकाणीं नेण्याचें साधन, ४ नंतर त्या पात्रांत राहिलेलें पांढरें स्वच्छ व घट्ट प्याराफीन पातळ करून पुनः गाळण्यास पाठविण्याचें साधन.