नळीतील प्याराफीन पातळ करण्यास सुलभता येते. त्या मुख्य नळीचा शेवट बारीक करून तेथें एक काक लागू करून तो खालच्या बाजूस उघडेल असा ठेवावा.
काम करण्याची रीत — हौदांतील प्याराफीन घट्ट असल्यास त्यांत चाफ सोडून तें पातळ करावें. ह्मणजे तें मोठ्या नळींतून तीस जोडलेल्या अर्ध्या इंच व्यासाच्या नळींत तीन डोक्याच्या पितळी काकपर्यंत संहज येऊ शकतें. तो तीन डोक्यांचा काक फिरविला ह्मणजे दोन आडव्या नळ्यांत जाऊन तेथून त्यांच्या प्रत्येक तोंडांतून चार साचांत पडतें. या चार साचांपैकी प्रत्येक साचा भरला ह्मणजे त्यास ठेवलेल्या दोन खाचांतून दुसन्या थरांतील साचांत जातें. याप्रमाणें दरेक थरांतील ४ साचे भरले कीं खालच्या थरांतील साचांत तें प्याराफीन जातें. शेवटच्या थरांतील साचे भरले ह्मणजे तो काक बंद करावा. या रीतीनें कामाच्या प्रमाणानें पाहिजे तितके साचे भरले ह्मणजे तें काम बंद करावें. हें मेण घट्ट होऊन त्याजवर दुसरी क्रिया करण्यायोग्य होण्यास २४ तास लागतात. याप्रमाणें कित्येक मण मेणाच्या वड्या पाडण्याच्या कामी देखरेख करण्यास एक मनुष्य पुरा होतो.
ही प्रथम क्रिया त्या प्याराफीनवर करण्यास, बैठकी साचे, नळ्या, काक वगैरे संबंधाने खर्च व त्रास बराच पडतो ह्मणून दुसऱ्या साध्या रीतीने पण ही क्रिया करण्याचा शोध लागला आहे. पण हिच्यांत जागा फार लागते. ती रीत पुढें लिहिल्याप्रमाणें आहे:-
वडा पाडण्याची दुसरी रीत - लोखंडाचा एक लहान व एक मोठा असे दोन हौद तयार करावे. मोठा हौद सुमारें ६० फूट लांब व १० फूट रुंद असावा. मोठ्या हौदांत त्याच्या काठाखालीं ३ इंच राहील इतकें पाणी भरावें. लहान हौदांत पातळ प्याराफीन सोड-ण्यास सुरू करावें. तो लहान हौद भरला ह्मणजे त्यांत येणारे जास्त
पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१०९
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८५